सीड बॉल बनवून दिला ग्रीन सिटीचा नारा

सीड बॉल बनवून दिला ग्रीन सिटीचा नारा

सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे) बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. स्मृतीवन उद्यानात शेकडो सोलापूरकरांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. 

आपली सिटी स्मार्ट सिटी.., आपली सिटी ग्रीन सिटी..च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. पर्यावरण संवर्धनासाठी आपला कृतीशील सहभाग असायलाच हवा याच उद्देशाने अनेक पालक आपल्या मुलांना घेवून सीड बॉल बनविण्यासाठी आले होते. लिंबोळ्या, चिंचोके, वड, पिंपळ, टरबूज, लिंबू, करंज, रिठा, कलिंगड, बहावा, शेवगा, आंबा, जांभूळ यासह विविध झाडांच्या बिया आणल्या होत्या. पर्यावरण अभ्यासक मुकुंद शेटे यांनी सीड बॉल बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनअधिकारी सुवर्णा माने यांनी महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानाची माहिती दिली. वनक्षेत्रपाल तुकाराम जाधवर यांनी वृक्ष लागवडीसाठी तयार होणाऱ्या रोपांची माहिती सांगितली. 

यावेळी पर्यावरण अभ्यासक प्रा. धनंजय शहा, वनरक्षक महेश हिरेमठ, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, इको फ्रेंडली क्‍लबचे परशुराम कोकणे, भाऊराव भोसले, शिवराम सरवदे, स्वाती भोसले, सरस्वती कोकणे, अभिषेक दुलंगे, श्रध्दा सक्करगी, मानसी गोरे, प्रेषिता चपळगावकर, वेदांत गनमोटे, संदीप कुलकर्णी, रजनीकांत जाधव, चेतन लिगाडे, डॉ. वीणा पवार, ऋषिकांत बळवतकर, सुरेश नकाते, बसवराज जमखंडी, पंकज चिंदरकर, संतोष धाकपाडे, अनिल जोशी, मोनिका माने, शिवकुमार देढे, कृष्णा माळवेकर, वैष्णवी पुराणिक, विनय गोटे, शांता येळमकर, विजय जाधव, अमोल तारापूरे, चंद्रकांत दुधाळ, राहूल बिराजदार, उमाकांत धनशेट्टी, सिद्धेश्‍वर बाड, कृष्णा थोरात, सुरेश क्षीरसागर यांच्यासह निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. 
 
मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाची आवड निर्माण होण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. आम्ही सीड बॉल कार्यशाळेत आमच्या मुलीला घेवून सहभागी झालो. सोलापूरला स्मार्ट सिटी करण्यासोबतच ग्रीन सिटी करण्यासाठी शेकडो पर्यावरणप्रेमींचा उत्साह दिसून आला. 

- अक्षता बळवतकर, पालक 

सीड बॉल कार्यशाळेला येताना अनेकांनी घरी जमवलेल्या बिया आणल्या होत्या. शेकडो सोलापूरकरांनी जवळपास एक हजार सीड बॉल बनविले. अशा उपक्रमातून सोलापूरकरांना वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी प्रोत्साहन देण्याचे काम होत आहे. 
- प्रा. धनंजय शहा, पर्यावरण अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com