तिखट खिशाला झोंबतय 

chilli raise in sangli.jpg
chilli raise in sangli.jpg
Updated on

सांगली : यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दहा-बारा दिवसांपासून तिखट करण्यासाठी लोकांची कांडप मशिनवर झुंबड उडाली आहे. मिरचीची आवक कमी झाल्यामुळे विविध प्रकारच्या मिरची दरात सरसरकट 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. उन्हाळा संपत आल्यामुळे गृहिणींची तिखटांसाठी धावाधाव सुरू आहे. शहरी, ग्रामीण भागात कांडप मशिन रात्रन्‌ दिवस सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळते. एक किलो तिखटासाठी सुमारे 450 ते 500 रुपये मोजावे लागताहेत. त्यात मिरची दरवाढीचा वाटा मोठा आहे. 

तिखट करण्यासाठी एप्रिल महिन्यांपासून लोक सुरू करतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 22 मार्च पासून जनता कर्फ्यू आणि त्यानंतर लॉकडाऊन सुरू केल्यामुळे तिखटासाठी लोकांनी हवी तशी मोकळीक मिळू शकली नव्हती. अत्यावश्‍यक किराणा सेवा सुरू ठेवल्या तरीही या काळात 25 टक्के ग्राहकही तिखट करण्यासाठी धजावले नाहीत. अर्थात कोरोना काही सहजा सहजी तातडीने संपणार नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून लोकांनी तिखटांसाठी तयारी सुरू केली. 18 मे रोजी लॉकडाऊन बऱ्यापैकी शिथिल केल्यापासून गेल्या दहा दिवसांपासून कांडपाच्या ठिकाणी ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. यंदा मिरचीच्या दरात 30 ते 40 टक्केंनी वाढ झाली आहे. नेमकी याच दिवसात मिरचीची आवक कमी अन्‌ दर भडकले आहेत. 

  • कर्नाटक, तमिळनाडूतून मिरची आवक 
  •  मसाला साहित्याचीही दरवाढ  
  • मिरची दरवाढ (किलोत) 
  • देशी संकेश्वरी 120 वरून 170,
  • लवंगी, तेजा 140 वरून 200,
  • बॅडगी 180 वरून 280.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com