कोल्हापूरः कणेरीवाडीत क्लोरिन वायूची गळती

सुनील पाटील
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर - कणेरीवाडी येथील दत्तनगरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुध्दीकरण केंद्रात क्लोरिन वायूची गळती मध्यरात्री एकच्या सुमारास झाली. तातडीने त्यांनी अग्निशमन दलाची मदत घेतली.

कोल्हापूर - कणेरीवाडी येथील दत्तनगरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुध्दीकरण केंद्रात क्लोरिन वायूची गळती मध्यरात्री एकच्या सुमारास झाली. तातडीने त्यांनी अग्निशमन दलाची मदत घेतली.

मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांच्या नेतृत्वात अग्निशमन दलाचे जवान तातडीने गळती रोखण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग वाहनासह घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी संबधीत सर्व यंत्रनाना घटनास्थळी पाचारण केले. क्लोरिनवायूच्या गळतीनंतर या परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे स्वतः स्थितीवर लक्ष ठेवून होते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी समन्वय साधला. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही वायू गळती रोखण्यात यश आले. अग्निशमनचे अधिकारी मनिष रणाभिसे यांनी स्वतः कृती पार पाडत ही वायू गळती रोखली. 

Web Title: Chlorine gas leak in Kaneriwadi in Kolhapur