...अन्यथा सीआयडी चौकशी करावी लागेल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

कोल्हापूर - नोटाबंदीच्या काळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची रीतसर माहिती देण्यासाठी एसटीच्या विभाग नियंत्रकांनी पुढे यावे, अन्यथा सीआयडी चौकशी लावून झालेले व्यवहार तपासण्यात येतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला असल्याची माहिती पतित पावन संघटनेने पत्रकाद्वारे दिली. 

कोल्हापूर - नोटाबंदीच्या काळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची रीतसर माहिती देण्यासाठी एसटीच्या विभाग नियंत्रकांनी पुढे यावे, अन्यथा सीआयडी चौकशी लावून झालेले व्यवहार तपासण्यात येतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला असल्याची माहिती पतित पावन संघटनेने पत्रकाद्वारे दिली. 

नोटाबंदीच्या काळात एसटी महामंडळाच्या रोख व्यवहारातून अनेकांनी नोटा बदलल्याचा आरोप पतित पावन संघटनेने केला होता. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी बोलावून घेतले. या बैठकीत पालकमंत्र्यांनी नोटा बदलल्याच्या आरोपाबाबत आढावा घेतला. तसेच सकृतदर्शनी घोटाळा झाल्याचे दिसत नसले तरी 500 व एक हजारांच्या नोटा बदलल्या या प्रकारची आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी येत्या 9 किंवा 10 मे रोजी बैठकीस उपस्थित राहावे, अशा अशा सूचना दिल्या. दरम्यान, पतित पावन संघटनेने गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन नोटाबंदीच्या काळात एसटी आगारातून नोटा बदलल्याचा आरोप केला होता. त्याबाबत विभाग नियंत्रकांनी केलेल्या खुलाशात असा प्रकार घडलेला नसून नोटाबंदीच्या काळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली असल्याचे पत्रकारांना सांगितले होते; मात्र आज बैठक सुरू होण्यापूर्वीच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल उपजिल्हाधिकारी शिंदे यांच्याकडे दहा मिनिटे अगोदर दिला, असेही शिंदे यांनी सांगितले. यावरून विभाग नियंत्रकांनी दिलेली माहिती खोटी असल्याचा दावा संघटनेने पत्रकाद्वारे केला आहे. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील, मधुकर नाझरे, महेश उरसाल, विजयसिंह खाडे, राजेंद्र सूर्यवंशी आदी बैठकीस उपस्थित होते. 

Web Title: CID inquiry