सोलापुरात वाढताहेत सिगारेट ओढण्याचे अड्डे!

परशुराम कोकणे
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

इथे आहेत सिगारेट ओढण्याचे अड्डे.. 
संभाजी तलाव परिसर, आसरा चौक, होटगी रोडवरील विक्रीकर भवन परिसर, महापालिकेच्या मागील बाजूस, अशोक चौक, सत्तर फुट रोड परिसर, गांधी नगर चौक, गुरुनानक चौक, कुमठा नाका चौक, जगदंबा चौक, वालचंद कॉलेज परिसर, संगमेश्‍वर कॉलेज परिसर. 

सोलापूर : शासनाकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जात असला तरी शाळा, महाविद्यालय परिसरासह सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे सिगारेट ओढले जात असल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात सिगारेट ओढण्याचे अड्डे वाढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असूनही पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना सोलापूरकरांना सिगारेटपासून परावृत्त करण्यासाठी कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची आवश्‍यकता आहे. 
कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या परिसरात सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादनां विक्री करण्यास मनाई आहे. सिगारेट किंवा कोणतेही इतर तंबाखू उत्पादन विकणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई केली जाते. गुन्हे शाखेच्या माध्यमातून अशाप्रकारची कारवाई सोलापुरात केली जात असली तरी कारवाईत सातत्य नसल्याने विक्रेत्यांसोबतच सिगारेट ओढणारे, तंबाखू खाणाऱ्यांमध्ये कायद्याची भिती नसल्याचे चित्र आहे. 

इथे आहेत सिगारेट ओढण्याचे अड्डे.. 
संभाजी तलाव परिसर, आसरा चौक, होटगी रोडवरील विक्रीकर भवन परिसर, महापालिकेच्या मागील बाजूस, अशोक चौक, सत्तर फुट रोड परिसर, गांधी नगर चौक, गुरुनानक चौक, कुमठा नाका चौक, जगदंबा चौक, वालचंद कॉलेज परिसर, संगमेश्‍वर कॉलेज परिसर. 

शासनाच्या कोटपा कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी विशेषत: शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात सिगारेट ओढणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. शहरात कोणत्याही परिसरात मोठ्या प्रमाणात सिगारेट ओढले जात असेल तर तत्काळ 7507133100 या मोबाईल क्रमांकावर माहिती कळवावी. ही माहिती कळविणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. 
- अभय डोंगरे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cigarette smoking areas increases in Solapur