'सर्किट हाऊस' द्वारे हास्यकल्लोळ्ळात बुडाले रसिकजन

drama
drama

अक्कलकोट - येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने ३१ वा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तनाच्या आजच्या आठव्या पुष्पाचा शुभारंभ प्रख्यात मराठी कलाकार संजय नार्वेकर यांनी 'सर्किट हाऊस' या गाजलेल्या नाटकाने गुंफले. आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ युवासेना प्रमुख गणेश वानकर, भाजपा नेते संजय कोळी, गौरव पीसे, उद्योगपती सुनील कलंगुटकर यांच्या हस्ते समर्थ पूजन आणि नंदादीप प्रज्वलीत करून करण्यात आला. 

मान्यवरांचा सत्कार अन्नछत्र कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले यांच्या हस्ते तर नाट्यकलावंताचा सत्कार अन्नछत्र अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी केला. या प्रसंगी अन्नछत्र जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब निंबाळकर, अरूण जाधव, प्रविण देशमुख, महेश गायकवाड, अनंत अंबुरे यांचा सन्मान करण्यात आला.

सर्किट हाऊस नाटकातून राजकारणा वर उपहासात्मक विनोदाने समस्त रसिकजन हास्यकल्लोळ्ळात बुडाले. सर्किट हाऊसने सतत प्रेक्षकांना खिळवून ठेवले आणि उपस्थित सर्वांचे निखळ मनोरंजन झाले. भव्य रंगमंच, योग्य विद्युत संगती यांनी सर्किट हाऊस हा प्रयोग बहारदाररित्या सादर करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमोल शिंदे, संतोष पवार, अन्नछञ उपाध्यक्ष अभय खोबरे,  सचिव शाम मोरे, डॉ. मनोहर मोरे, विश्वस्त अलका भोसले, अनुया फुगे, अर्पिता भोसले, अनिता खोबरे, वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे, पोलिस निरिक्षक भगवानराव निंबाळकर, दत्ता जाधव, नितीन कटारे, उषा हंचाटे, अनिता क्षिरसागर,लता मोरे, कोमल क्षिरसागर, प्रविण घाटगे, आकाश गडकरी, लाला राठोड, प्रशांत शिंदे, मनिषा माळशेट्टी, रोहित खोबरे,लक्ष्मण पाटील,संतोष भोसले, आप्पा हंचाटे, रविद्र भंडारे, रोहन शिर्के, मोहिनी राव, गौरी दातार , निखिल पाटील यांच्यासह हजारो भक्तजन उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूञ संचलन श्वेता मालप यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com