esakal | सांगलीत 'विनाकारण' फिरणाऱ्यांवर पोलिसांची 'कडक' कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

sangli police

सांगलीत 'विनाकारण' फिरणाऱ्यांवर पोलिसांची 'कडक' कारवाई

sakal_logo
By
- शैलेश पेटकर shaileshpetkar२@gmail.com

सांगली : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यसरकारने संचारबंदी लागू केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य चौकात काल रात्री आठपासून पोलिसांनी ताबा घेता आहे.विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिस दलाकडून केले जात आहे. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले यांच्यासह शहर पोलिसांनी आज मुख्य चौकातून संचलन काढले. यावेळी नागरिकांना विनाकारण रस्त्यावर फिरू नका, असे आवाहन करण्यात आले.

कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. काल रात्री आठ वाजल्यापासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रभारी अधिकारी संचलन काढले. शहरातील मुख्य चौकातील संचलन काढण्यात आले.कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे आवाहन करण्यात आले. अत्यावश्‍यक कामाशिवाय रस्त्यावर फिरू नये, तसेच विनामास्क फिरल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

हेही वाचा- स्फोटकांचा शोध लागणार आता काही क्षणात ; देवराष्ट्रेच्या दिपकचे संशोधन

आज सकाळपासूनच शहरातील विश्रामबाग चौक, राजवाडा चौक, पुष्पराज चौकासह मुख्य चौकात पोलिसांनी बॅरागेट लावून तपासणी सुरू केली होती. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती. सकाळी पोलिस अधीक्षक गेडाम यांनी स्वतः कॉग्रेसभवन जवळ वाहनांची तपासणी केली. दुपारनंतर सर्व रस्ते ओस पडले होते.दरम्यान, होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना कोरोना नियमांचे पालन सक्तीचे आहे. त्यांच्याकडून नियमांचे पालन होते की नाही, याची अंमलदारांकडून तपासणी करण्यात येत होती.

संपादन : अर्चना बनगे