किराणा माल नाय... खायचे काय...

किराणा माल नाय... खायचे काय...
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) ः कऱ्हाड-पाटण तालुक्‍यांतील ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना किराणा माल मिळताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. कऱ्हाडमधील 100 टक्के लॉकडाउनमुळे होलसेल व्यापाऱ्यांकडून माल मिळत नाही. त्यांच्याकडे बाहेरून माल आवश्‍यक त्या प्रमाणात मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गावोगावच्या किराणा मालांच्या दुकानांची घडी विस्कटली आहे. परिणामी ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होत आहे. त्यावर प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने केंद्र सरकारने अगोदर जारी केलेल्या लॉकडाउनमध्ये वाढ केली आहे. त्यातच कऱ्हाड, मलकापूर व परिसरातील गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रादुर्भाव वाढू नये आणि सुरू झालेली बाधितांची साखळी तुटावी यासाठी कऱ्हाड, मलकापूरसह 12 गावे पूर्णतः 100 टक्के लॉकडाउन करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला आता 11 दिवस झाले. त्या दरम्यानच्या काळात सर्वच व्यवहार बंद आहेत. कऱ्हाडमधील व्यापाऱ्यांकडून कऱ्हाड तालुक्‍यासह पाटण, खटाव, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुक्‍यांतील गावांना किराणा माल होलसेल स्वरूपात येथील व्यापाऱ्यांकडून दिला जातो. मात्र, कऱ्हाड शहरातच पूर्णतः लॉकडाउन असल्याने व्यापाऱ्यांनाही माल देताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. बाहेरून माल आवश्‍यक त्या प्रमाणात मिळत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यातच पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने व्यापारीही मागणी असूनही माल देत नाहीत, अशी सद्य:स्थिती आहे. त्यामुळे संबंधित तालुक्‍यांतील ग्रामीण भागातील दुकानदारांना किराणा माल विक्रीसाठी मर्यादा येऊ लागल्या आहेत. परिणामी गावोगावच्या किराणा मालांच्या दुकानांची घडी विस्कटली आहे. 

पाटणला घरपोच किराणा मालाची मागणी 
पाटण तालुक्‍यातील डेरवण-चाफळला एक दहा महिन्यांचे बाळ कोरोनाबाधित सापडले. ते बाळ कोरोनामुक्त झाल्याने त्याला घरीही सोडण्यात आले. मात्र, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पाटण, नवारस्ता, तारळे, मल्हापरपेठ, ढेबेवाडी, तळमावले लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून तेथील सर्व व्यवहार ठप्प आहेत. दरम्यान, संबंधित ठिकाणच्या लोकांचा किराणा माल संपला आहे. त्यांना सध्या उदरनिर्वाहासाठी किराणा मालाची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने पाटण तालुक्‍यातील संबंधित ठिकाणी कऱ्हाडसारखी घरपोच किराणा माल देण्याची सुविधा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur contractor bribery allegations
Mahayuti Under Strain? Satara-Sangli Election Turns Into a Political Test
Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026
Satej Patil Supports Farmers in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com