कऱ्हाडकरांच्या मानगुटीवर 85 फुटी रस्त्याचे भूत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

कऱ्हाड : कऱ्हाड ते तासगाव रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तो रस्ता 85 फुटाचा असणार आहे. त्याच्या गॅझेटनंतर तब्बल वर्षाने रस्त्यासाठी जमिनी आरक्षित करण्यासाठी रस्ता मोजणीची प्रक्रीया आजपासून प्रत्यक्षात शहरात सुरू झाली. त्या 85 फुटाच्या रस्त्याच्या आरक्षणात शहरातील भेदा चौक ते कार्वे नाका येथील मिळकतधारांना झळ बसते आहे. त्यामुळे लोकांत संताप व्यक्त होत आहे.

कऱ्हाड : कऱ्हाड ते तासगाव रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तो रस्ता 85 फुटाचा असणार आहे. त्याच्या गॅझेटनंतर तब्बल वर्षाने रस्त्यासाठी जमिनी आरक्षित करण्यासाठी रस्ता मोजणीची प्रक्रीया आजपासून प्रत्यक्षात शहरात सुरू झाली. त्या 85 फुटाच्या रस्त्याच्या आरक्षणात शहरातील भेदा चौक ते कार्वे नाका येथील मिळकतधारांना झळ बसते आहे. त्यामुळे लोकांत संताप व्यक्त होत आहे. येथील दत्त चौकातून बैलबाजार मार्गे जाणाऱ्या रस्त्याच्या शंभर फुटी रस्त्याचे भुत कऱ्हाडच्या मानगुटीवरून नुकतेच उतरले असतानाच आता पुन्हा नव्या वर्षात त्याच भागातील नागरीकांच्या मानगुटीवर 85 फुटी रस्त्याचे भुत बसण्याचे संकेत मिळाले आहेत. त्या विरोधात नागरीक आंदोलनाच्या तयारीत आहेत. 

कऱ्हाड ते तासगाव रस्त्याला महामार्गाचा दर्जा मिळाल आहे. त्याचे गॅझेट 3 जानेवारी 2017 रोजी झाले आहे. तो राष्ट्रीय महामार्गा 266 अशा जाहीर झाला आहे. त्यामुले त्या रस्त्याचे काम तासगाव ते कऱ्हा़ड रस्त्यावर विविध ठिकाणी सुरू आहे. प्रत्यक्षात त्या रस्त्याच्या जागा आरक्षीत करण्याच्या शहराच्या हद्दीतील प्रक्रीयेस आजपासून प्रारंभ झाला. त्यात शहराच्या हद्दीतील भेदा चौक ते कार्वे नाक्यापर्यंतची शहराच्या हद्दीपर्यंतच्या बागाचा समावेस होतो आहे. त्या भागात आज राष्ट्रीय रस्ते विभागाचे पलूस व कोल्हापूर येथील अधिकाऱ्यांनी आज पहामी केलेी. तेथे मारिकींगही केले. त्यावेळी तो रस्त्या दोन्ही बाजूने किमान अकार मीटरचा होणार आहे, अशे जाहीर करण्यात आळे आहे. त्यामुळे भागातील नागीराकांत संभ्रम निर्माण झाला आहे. मुळातच रस्ता मोटा अशताना येथे स्वतंत्र रस्ता वाढविण्याची गरज नाही. त्यामुळे नागरीकांच्या मिळकतींना धोका पोचणार आहे, त्यामुळे आम्ही त्याला विरोध करणार आहोत, असी भुमिका शंभर फुटी रस्त्या विरोेधी कृती समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय शिंदे यांनी स्पष्ट केली आहे.

ते म्हणाले, कऱ्हाड ते तासगाव रस्ता राष्ट्रीय महामार्गा झाला आहे. कऱ्हाडच्या विकास आराखड्यात तो रस्ता पन्नास फुटाचा आहे. सुधारीत आराखड्यात तो 60 फुटी जाला आहे. त्यामुळे 85 फटी रस्ता रद्द होण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहोत. ज्या प्रमाणे शंभर फुटी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्या प्रमाणे कऱ्हाड ते तासगाव रस्त्याचा प्रश्नही मार्गी लावणार आहोत.

कऱ्हाड ते तासगाव रस्त्याचे काम सुरू आहे. त्यात कऱ्हाड शहरातील जो काही रस्त्याचा भाग समाविष्ठ होतो आहे. त्यात भेदा चौक ते कार्वे नाका याचा समावेश आहे. त्या भागात आज डिमार्पकेशन झाले मोजमी नंतर होणार आहे. मात्र हा रस्ता आहे तितकाच पुरेस आहे. त्यामउले येथे कोणताही वाढ किंवा जागा आरक्षीत असा प्रकार होणार नाही, याची आम्ही काळजी गेत आहोत. 
- अजय अडमुठे, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर

Web Title: citizens of karhad faces problem of 85 ft road