कऱ्हाडकरांनी दिला अटलजींच्या आठवणींना उजाळा

सचिन शिंदे 
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

कऱ्हाड : भारत को महसत्ता बनाना है, तो जनसंघ का संघटन महत्वपूर्ण है, असे आवेशपूर्ण भाषण करून अटलजींनी जनसंघाचे महत्व पटवून दिले. त्याचवेळी त्यांना त्याच कार्यक्रमात त्याकाळात 75 हजारांची थैली भेट देण्यात आली होती. ती मदत पाहून वाजयपेयी भावूक झाले होते. त्यांचा भाषणरूपी आवाज कऱ्हाडात घुमला त्याला 47 वर्ष पूर्ण होत आहेत.

कऱ्हाड : भारत को महसत्ता बनाना है, तो जनसंघ का संघटन महत्वपूर्ण है, असे आवेशपूर्ण भाषण करून अटलजींनी जनसंघाचे महत्व पटवून दिले. त्याचवेळी त्यांना त्याच कार्यक्रमात त्याकाळात 75 हजारांची थैली भेट देण्यात आली होती. ती मदत पाहून वाजयपेयी भावूक झाले होते. त्यांचा भाषणरूपी आवाज कऱ्हाडात घुमला त्याला 47 वर्ष पूर्ण होत आहेत.

भाजपपूर्वी जनसंघ होता, त्याच्या संघटनासाठी 21 एप्रिल 1970 रोजी कऱ्हाडला माजी पंतप्रधान ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची येथील टिळक हायस्कूलमध्ये जाहीर सभा झाली. त्यावेळचे पालिकेचे माजी नगरसेवक श्रीनिवास लद्दड यांनी त्या सभेचे आयोजन केले होते. श्री. वाजपेयी यांनी दुपारी सभा केली. त्यापूर्वी त्यांनी लद्दड यांच्याही घरी भेट दिली होती. त्या आठवणींना त्यांचे चिरंजीव दिनेश लद्दड यांनी उजाळा दिला.

लद्दड यांचे चावडी चौकात श्री वल्लभ नावाने कपड्याचे शोरूम आहे. वाजपेयी यांच्यासह भाजपचे गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचे जवळचे संबध असलेले कुटूंब अशी त्यांची ओळख आहे. दिनेश लद्दड यांचे वडील श्रीनिवास लद्दड 1970 च्या काळात नगरसेवक होते. त्यावेळी त्यांनी जनसंघाचे काम केले होते. श्रनिवास लद्दड यांचा मृत्यू होवून पंधरापेक्षा जास्त वर्षांचा कालवधी झाला आहे. त्यांच्या नगरसेवकपदाच्या कालवधीत त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जनसंघाची जाहीर सभा येथे घेतली होती. त्याच्या आठवणी आजही ताजा आहेत. त्या काळात टिळक हायस्कूल येथे जाहीर सभा झाली होती. ती सभा दुपारी होणार होती. त्यापूर्वी श्री. वाजपेयी यांनी लद्दड याच्या घरी भेट दिली होती. तो प्रसंग लद्दड कुटूबियांना आजाही आठवतो आहे. अर्थात त्या घटनेला 47 वर्ष झाली आहेत. त्यामुळे नेमक्या त्या स्थितीबाबात कोणास सांगता येत नाही. मात्र वाजपेयी यांचे त्या काळात जालेल्या भाषणाचे छायाचित्र अद्यापही त्यांच्याकडेउपलब्ध आहे. त्याशिवाय वाजपेयी यांचा फोटा टिळक हायस्कूलचे त्याकळाताली कला शिक्षक पा. ह. देशपांडे यांनी रेखाटले होते. तेही तालचित्र आजही त्यांनी जतन करून ठेवले आहे. 

वाजपेयी यांच्याबद्दल आठवणी सांगताना दिनेश लद्दड म्हणाले, घटनेला बरीच वर्षे झाली आहेत. त्या काळात जनसंघाचे काम करणे तसे कठिण होते. मात्र त्यातूनही वडीलांनी सभा ठेवली होती. आम्ही लहान होता. मात्र वाजपेयी घरी आल्याचे व ते वडीलांशी बोलल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्यावेळी टिळक हायस्कूलमध्ये सबा झाली होती. त्या सभेत अठलजींचा आवेश बघण्यासारखा होता. त्यावेळी त्यांना मदत म्हणून 75 हजारांची थैली देण्यात आली होती. त्यावेळी भावूनकही झाले होते. माझे वडील श्रीनिवास लद्दड पालिकेचे नगरसेवक होते. सोमवार पेठेतून ते निवडूण आले होते. त्यानंतर राजकारणात अमच्यातील कोणाही नाही. वडीलांचे निधन सुमारे वीस वर्षापू्र्वी झाले. त्यावेळीही श्री. वाजपेयी यांचा सोकसंदेश आला होता. इतकी ते आपल्या लोकांची काळजी घेत होते.

Web Title: citizens of karhad remembering atal bihari vajpayee on his death