आजरा तालुक्यात स्टोव्हचा भडका उडून सिव्हिल इंजिनियरचा भाजून मृत्यू

आजरा तालुक्यात स्टोव्हचा भडका उडून सिव्हिल इंजिनियरचा भाजून मृत्यू

उत्तूर - धामणे (ता. आजरा) येथे स्टोव्हचा भडका उडून सिव्हिल इंजिनियरचा भाजून मृत्यू झाला. दिनकर विठोबा दाभोळे (वय ५०) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

दाभोळे यांची पत्नी व मुलगी गल्लीतील खासगी कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. यावेळी जेवण गरम करण्यासाठी दिनकर यांनी स्टोव्ह पेटवण्याचा प्रयत्न केला. पण भडका उडाल्याने स्वयपाक घरासच आग लागली. या घटनेत दिनकर भाजून गंभीर जखमी झाले. थोड्या वेळानंतर घरातून धूर येवू लागला. गल्लीतील नागरीकानी घटनास्थळी धाव घेतली. पाणी मारुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घोरपडे साखर कारखान्यातून अग्निशामक दलासही पाचारण करण्यात आले. पण दिनकर यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com