
"Police inspecting the spot in Islampur where a Dandiya celebration clash left four injured."
इस्लामपूर : दांडिया खेळताना माईकवर नाव घेतल्याच्या रागातून सात जणांनी मिळून केलेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले. याप्रकरणी रुपाली धोंडिराम कोठावळे (वय ४०, रा. शिवनगर रस्ता क्रमांक १, इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवार (ता. २४) रात्री १० वाजता शिराळा नाक्यावरील शिवशाही नवरात्र उत्सव मंडळाच्या समोर हा प्रकार घडला.