ब्रेकिंग :दहावीची परीक्षा पुढे ढकलली, एप्रिलच्या 'या' आठवड्यात होणार परीक्षा....

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 22 March 2020

मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी रविवारी सकाळी दहावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 27 मार्चपासुन दहावीच्या परीक्षेला सुरूवात होणार होती. मात्र परिक्षा पुढे ढकलत विध्यार्थ्यांची काळजी घेण्यात आली आहे .

बेळगाव  : कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे सावधानता बाळगण्यासाठी कर्नाटकात 27 मार्च पासून सुरू होणारी दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे परिक्षेबाबतची संभ्रमावस्था संपली असून शिक्षण खात्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत येत्या दोन दिवसात सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. 

मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी रविवारी सकाळी दहावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 27 मार्चपासुन दहावीच्या परीक्षेला सुरूवात होणार होती. मात्र परिक्षा पुढे ढकलत विध्यार्थ्यांची काळजी घेण्यात आली आहे .

दहावी परीक्षेसाठी नवीन नियमावली

हेही वाचा- जुनी धामणीत दोन गटात राडा
कोरोनापासुन सावधानता बाळगण्यासाठी शिक्षण खात्याने विविध उपाय योजना राबविण्यास सुरुवात केली असून दहावी परीक्षेसाठी नवीन नियमावली तयार केली आहे. तसेच परीक्षा सुरळीतरित्या पार पडावी यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आल्या असून याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक ती माहिती द्यावी असे सुचविण्यात आले आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा

हेही वाचा- खबरदारी! तिघे विदेशी उतरताच घेतले ताब्यात
काही दिवसांपूर्वी शिक्षण खात्याने 1 ते 6 च्या परीक्षा रद्द केल्या होत्या तर 7 ते 9 च्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती मात्र दहावीच्या परीक्षा जाहीर केलेल्या वेळापत्रका प्रमाणे 27 मार्च ते 9 एप्रिल पर्यंत होणार होती. परंतु  कोरोनामुळे विविध प्रकारच्या खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे दहावीची परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Class X exams postponed exams to be held in the first week of April belgum marathi news