गडकोट संवर्धनाचा संदेश देत किल्ले विजदुर्गची मोहीम फत्ते

A clean campaign was launched in the fort Vijaydurg
A clean campaign was launched in the fort Vijaydurg

फलटण (जि. सातारा) - जलसंधारणाची कास धरुन राज्यात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अनभुलेवाडी (ता. माण) येथील श्री महालक्ष्मी शिवज्योत मंडळाने गडकोट संवर्धनाचा संदेश देत किल्ले विजदुर्ग येथे स्वच्छता मोहीम राबविली.

परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खेडोपाड्यात दसरा दिवाळी प्रमाणे उत्साहात साजरी केली जाते. यामध्ये प्रत्येक वर्षी स्वराज्याचे शिलेदार व छत्रपतींच्या वास्तवाने पावन झालेल्या गडकोटावरुन त्यांच्या विचारांची मशाल गावागावात आणतात. त्यामुळे आजही ग्रामीण भागातील युवकांची समाजाबद्दल असलेली आपुलकीची भावना व ऐक्य टिकून आहे.  

यावेळी अनभुलेवाडी गावात किल्ले विजदुर्ग या ठिकाणाहून ज्योत आणण्यात येत आहे. यानिमित्ताने (ता. 14) रोजी रात्रीच मुक्कामासाठी सर्व युवक किल्ला परिसरात गेले होते. याठिकाणी पोहचल्यानंतर किल्ला परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार करुन युवकांनी याठिकाणी साठलेला पाळापाचोळा, प्लॅस्टीकचा कचरा गोळा करुन त्याची योग्य ती सोई लावून परिसर स्वच्छ केला. या मोहीमेत प्रविण इंगळे, निवास निकम, प्रशांत इंगळे, दादासो जगदाळे, हणमंत निकम, सुनिल निकम, संतोष निकम, डॉ. बबन येळे आदींनी सहभाग घेतला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com