स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वच्छता मोहीम

राजकुमार शहा 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मोहोळ : स्वातंत्र्य दिनाचे औचीत्य साधुन व वाढदिवसाच्या हार फेटा पुष्पगुच्छ डिजीटल फलक या खर्चाला फाटा देऊन स्व अभिजीतदादा क्षीरसागर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय क्षीरसागर यांनी मोहोळ येथील विद्युत महापारेषण कार्यालय परिसरातील सुमारे चार एकर परिसरातील स्वच्छता मोहीम स्व खर्चाने हाती घेतली असून हे काम आठ दिवस चालणार आहे. त्यामुळे या परिसरातील गेल्या पंधरा वर्षातील अडचण दुर होणार आहे. यासाठी दोन लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे.

मोहोळ ते मंद्रुप या मार्गावर हे कार्यालय असून परिसरात चिलारी व इतर निरोपयोगी झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत त्यामुळे कार्यालय कुठ आहे हे नवीन येणाऱ्या नागरीकाला दिसत नव्हते. कार्यालयाभोवती तारेचे कुंपन असून त्याच्या ताराही तुटल्या आहेत त्यामुळे रात्री चोरी होण्याची शक्यता आहे. तसेच अडचणीमुळे त्या परिसरात साप विंचु या सारख्या विषारी प्राण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

कार्यालयाच्या जवळच अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान असुन त्याच्या भोवती ही चिलारी व इतर काटेरी झुडुपांचे साम्राज्य आहे. तुटलेल्या तारा दुरुस्त करुन त्याच्या भोवती असणारी अडचण जेसीबी च्या साह्याने स्वच्छ करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. परिसर स्वच्छ झाल्यानंतर कार्यालय परिसरात आंबा चिंच या फळझाडासह इतर शोभेच्या दोनशे वृक्षांचे रोपण  करण्यात येणार आहे. कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरीकांना बसण्यासाठी दहा बाकांची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगीतले.  प्रारंभी खराट्याच्या साहाय्याने स्वछता करण्यात आली त्यात महापारेषणचे सहाय्यक अभियंता अनिल अंकोलीकर, माजी उपसभापती बाळासो गायकवाड, नगरसेविका सिमा पाटील, सोमेश क्षीरसागर, अल्पसंख्यांक चे मुजीब मुजावर, नागेश क्षीरसागर, विशाल डोंगरे, शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, रमेश माने, सतीश पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला.  या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
 
Web Title: Cleanliness campaign on the occasion of Independence Day