जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेकडे दुर्लक्ष 

प्रवीण जाधव
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

सातारा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छ भारत मोहीम राबविली. मात्र, सर्वसामान्य रुग्णांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जिल्हा रुग्णालयातच गेल्या तीन वर्षांत स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रुग्णालय व परिसरात दुर्गंधी पसरत आहे. स्वच्छ भारत मोहिमेत प्रत्येक नागरिकाने भाग घेतानाच शासकीय कार्यालय स्वच्छ राहील, यासाठी तेथील विभाग प्रमुखाला जबाबदारी उचलण्यास सांगितले गेले आहे. त्यादृष्टीने काही कार्यालयांत स्वच्छतेविषयी जागृती वाढताना दिसते. मात्र, जिथे सर्वाधिक स्वच्छतेची आवश्‍यकता आहे, अशा जिल्हा शासकीय रुग्णालयात मात्र उलटी गंगा वाहत आहे. 

जिल्हा शल्यचिकित्सकपदावर कार्यरत असताना डॉ. सुरेश जगदाळे यांनी स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेचे उदाहरण दिले जात होते. रुग्ण व नातेवाईक स्वच्छतेच्या बाबतीत तरी पूर्ण समाधानी होता. कुठेही कचरा दिसू नये, याकडे त्यांचा कटाक्ष होता; परंतु त्यांची बदली झाल्यानंतर या स्थितीत बदल होत गेला. डॉ. जगदाळे हे पदावर असताना असलेली कर्मचारी संख्या कमी झाली. त्याला शासकीय निर्णयाचे कारण दिले गेले. शासनाकडे प्रस्ताव पाठवलाय, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतोय, अशी कारणे देण्याशिवाय काहीही झाले नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छतेत ढिलाई होत गेली. उपलब्ध कर्मचाऱ्यांकडूनही पुरेशा क्षमतेने काम करून घेण्याचे फारसे प्रयत्न रुग्णालयाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून होताना दिसले नाही. त्यामुळे पूर्वी स्वच्छ दिसणाऱ्या रुग्णालयात ठिकठिकाणी कचरा दिसत आहे. वॉर्ड व स्वच्छतागृहातही दुर्गंधी येऊ लागली आहे. 

अस्वच्छता ही अनेक आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे स्वत:ला, त्याचबरोबर घर व घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा सल्ला डॉक्‍टर देतात. परंतु, रुग्णांवर उपचार केले जातात, त्याच ठिकाणी अस्वच्छता असल्यावर करायचे काय? त्यामुळे रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यावरही परिणाम होत आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. 

स्वच्छतेची साधने देतानाही मर्यादा 
विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना मागणी करून स्वच्छतेसाठी आवश्‍यक असणारे फिनेल, निरमा पावडर, झाडू, स्वच्छतेची अन्य साधने उपलब्ध होत नाहीत. त्याबाबत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे इच्छा असूनही योग्य पद्धतीने सफाई करता येत नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

(क्रमशः) 

Web Title: cleanliness issue in the District Hospital