किल्ले प्रतापगडची लोकसहभागातून स्वच्छता 

bhilar
bhilar

भिलार - महाबळेश्वर पंचायत समिती आणि कुंभरोशी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वच्छता ही सेवा" या अभियानंतर्गत तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन व ऐतिहासिक स्थळ असलेल्या किल्ले प्रतापगड व परिसराची लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली. तसेच "पाणी आडवा पाणी जिरवा" या मोहिमेअंतर्गत गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या दोन वनराई बंधाऱ्यांचे बांधकामहि श्रमदानातून पूर्ण करून जल बचतीचा संदेश दिला. 

यावेळी जिल्हा परिषद जलसंधारण समिती सदस्य बाळासाहेब भिलारे, सभापती रुपाली राजपूरे, जिल्हा परिषद सदस्या निता आखाडे, उपसभापती अंजना कदम सदस्य संजय गायकवाड, आनंद उत्तेकर, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे, उद्यानपंडित गणपतशेठ पार्टे, प्रवीण भिलारे, विजय हवालदार, चंद्रकांत उत्तेकर, संतोष जाधव, सुरेश सावंत, गटविकास अधिकारी नारायण घोलप, सरपंच मोरे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कुंभरोशी येथील घरकुलांच्या कामाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. तर प्रतापगड स्वच्छता आणि वंनतळ्यामसाठी पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ यांनी श्रमदान केले. 

महाबळेश्वर तालुका हा नेहमीच प्रत्येक अभियानाबाबत अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत असतो प्रतिकुल परिस्थितीमध्ये अतिवृष्टीचा भाग असूनही या ठिकाणी होणाऱ्या अभियानामध्ये लोकांचा सहभाग मोलाचा होता. ही अभियान यशस्वी करण्यासाठी येथील नागरिक व पदाधिकारी नेहमीच आघाडीवर असतात असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी यावेळी केले. अभियान यशस्वी व प्रभावी पणे राबवणेसाठी तालुक्यामध्ये झालेल्या उपक्रमांची पाहणी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी नुकतीच काही पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळांची तसेच रस्त्यांची पाहणी करून सूचना दिल्या आहेत.

आगामी काळात हे अभियान यशस्वी करण्यासाठी गृह भेटी, ग्रामसभांचे आयोजन, सेवादीवस, प्लास्टिक गोळा करणे, नादुरुस्त शौचालय दुरुस्ती करून वापरायोग्य बनविणे ,बसस्थानके, बाजार ठीकाणे येथे पिण्याच्या पाण्याची टाकी व परिसर स्वच्छता, पर्यटन ठिकाणे स्वच्छ करणे हि कामे हाती घेण्यात आली असून पर्यटन व धार्मिक स्थळे असणाऱ्या क्षेत्र महाबळेश्वर, पार पार, भिलार, तापोळा , तळदेव या गावाचे ग्रामसेवकाना स्वच्छतेसाठी सूचना देण्यात आल्याचे सभापती रुपाली राजपूरे यांनी सांगितले. महाबळेश्वर तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या उर्वरित कामांचे नियोजन प्रतापगड येथील सांगता कार्यक्रमात यावेळी करणेत आले. तालुक्यात प्लास्टिक बंदी असूनही काही ठिकाणी प्लास्टिकचा वापर सुरु आहे हे नियंमबाह्य आहे यामुळे प्लास्टिक बंदीला व्यापक प्रसिद्धी देऊन पूर्णपणे प्लास्टिक हद्दपार करणेत यावे हा धोरणात्मक निर्णय घेणेत आलेला असून त्याचे पालन न कारणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई तात्काळ करणेत यावी अशा सूचनाहि यावेळी देणेत आल्या.

मतदार नोंदणी व नावे दुरुस्तीची मोहीम 31 ऑक्टोबरपर्यंत आहे याचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन नायब तहसीलदार यांनी यावेळी केले 
या कार्यक्रमास सहाय्यक गटविकास अधिकारी श्री सांगळे, विस्तार अधिकारी सुनील पार्टे, सिकंदर शेख, आप्पा जाधव, विश्वनाथ काटकर, ग्रामसेवक धैर्यशील गायकवाड तसेच त्यांचे सर्व सहकारी व कुंभरोशी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com