स्वच्छतेत महापालिका देशात 237 वी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

सांगली - देशातील 434 स्वच्छ शहरांच्या यादीत सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेचा 237 वा क्रमांक आला. यादीत राज्यातील 44 शहरांचा समावेश आहे. सांगलीचा राज्याच्या यादीत 30 वा क्रमांक आहे. महापालिकेची ही कामगिरी अपेक्षित इतकी चांगली नसली तरी गेल्या वर्षभरात पालिका प्रशासन व काही नागरिकांनी केलेल्या काहीशा प्रयत्नांमुळे बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. 

आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी हागणदारीमुक्त आणि स्वच्छ शहर मोहिमेसाठी प्रारंभपासून पुढाकार घेतला होता. त्यांनी नागरिकांसह स्वयंसेवी संस्थाना आवाहन केले होते. त्याला प्रतिसादही मिळाला; मात्र त्यात सातत्य नव्हते. लोकांचा उत्साह कमी पडल्याचे चित्र पुढे आले. त्यामुळे अपेक्षित कामगिरी होऊ शकली नाही. कचरामुक्त शहरासाठी पुढाकार घ्यायला हवा. पुढील वर्षभरात कामगिरी उंचावणारी असेल, अशा आशावाद अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी "सकाळ' शी बोलताना व्यक्त केला. 

"" महापालिकेची कामगिरी दमदार आहे. निर्मल शहर म्हणून यश मिळाले आहे. आता स्वच्छ शहर म्हणून पुढील वर्षभरात अधिक नेटाने काम करून राज्यात पहिला येण्याचा प्रयत्न करु.'' 
हारुण शिकलगार, महापौर 

""नागरिकांचा स्वच्छता कार्यात अपेक्षित सहभाग मिळणे गरजेचे आहे. छोट्या छोट्या उपक्रमांमधून हा सहभाग वाढवत न्यावा लागेल. नवी मुंबई महापालिकेने गेल्या वर्षभरात केलेल्या जागृतीमुळेच त्यांनी यावर्षी तळातून झेप घेतली आहे. आपल्यालाही खूप संधी आहेत. पुढील वर्षभर आम्ही आणखी जोमाने कामगिरी करून राज्यात पहिला येण्याचा प्रयत्न करु. विविध स्वयंसेवी संघटना-व्यक्तींनी महापालिकेसोबत काम करण्यासाठी पुढे यावे.'' 
रवींद्र खेबुडकर,आयुक्त 

""स्वच्छता अभियानात महापालिकेची कामगिरी दमदार झाली आहे; मात्र सर्व्हेक्षण फेब्रुवारी 2017 पुर्वीचे आहे. त्यानंतर स्वच्छतागृह उभारणी तसेच मोबाईल ऍप डाऊनलोड करून केलेल्या कामांची निर्गत याची दखल सर्व्हेक्षणात आलेली नाही. त्यामुळे राज्य स्तरावर आणि एकूणच देशस्तरावर महापालिकेला अपेक्षित स्थान मिळू शकले नाही. नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन केलेल्या कामाची शासनाचे दखल घेतली आहे. '' 
सुनील पवार, उपायुक्त 

Web Title: In cleanliness sangli 237 rank