चला, बनवू या..! टेंबलाई टेकडी सुंदर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर - टेंबलाई टेकडी म्हणजे येथील निसर्गाने दिलेला सुंदर वारसा. इथल्या शौर्यशाली परंपरेचं प्रतीक आणि शहराच्या रक्षणकर्त्या देवीचं स्थान. याच परिसराचा आता लोकसहभागातून कायापालट होणार असून त्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे.

कोल्हापूर - टेंबलाई टेकडी म्हणजे येथील निसर्गाने दिलेला सुंदर वारसा. इथल्या शौर्यशाली परंपरेचं प्रतीक आणि शहराच्या रक्षणकर्त्या देवीचं स्थान. याच परिसराचा आता लोकसहभागातून कायापालट होणार असून त्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे. महापालिका, देवस्थान समिती, टेंबलाई मंदिर वहिवाटदार गुरव-पुजारी मंडळासह विविध सेवाभावी संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, तरुण मंडळांच्या सक्रिय सहभागातून ‘चला, टेंबलाई टेकडी सुंदर बनवू या’ ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी (ता. २३) सकाळी सात ते नऊ या वेळेत टेंबलाई टेकडी परिसराची स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.

टेंबलाई टेकडी म्हणजे प्रत्येक कोल्हापूरकरांच्या मनातील आदराचं स्थान. त्र्यंबोली यात्रा असो किंवा नवरात्रोत्सव असे वर्षातून केवळ दोनदाच नव्हेतर एक निवांत आणि शुद्ध हवा देणारं स्थान म्हणूनही अलीकडच्या काळात या परिसराकडे कोल्हापूरकरांची पावलं वारंवार वळतात. या परिसराचे नैसर्गिक, ऐतिहासिक स्थान अबाधित ठेवत कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांनीही या परिसराला हजेरी लावावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर ही मोहीम राबवली जाणार आहे. टेंबलाई टेकडीवर आजवर विविध सुविधा देण्याचा प्रयत्न जरूर झाला; पण सद्यस्थिती पाहता परिसराची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे टेकडीवरील उद्यान, विविध शिल्पं असोत किंवा ओपन थिएटर, झाडांचे पार आदी गोष्टींची डागडुजी करावी लागणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleanliness on Tembali hill