गगनबावडा, अणुस्कुराकडे जाणारा मार्ग बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

कोल्हापूर - गगनबावडा व अणुस्कुरा या दोन्हीकडे जाणारे मार्ग पावसामुळे बंद झाल्याने जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडे होणारी वाहतूक जवळपास बंद झाली. एरवी वाहनांची भन्नाट ये-जा असणाऱ्या या दोन्ही मार्गांवर आज शुकशुकाट राहिला. गगनबावड्याकडे जाताना मांडुकली जवळ दोन ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. तर अणुस्कुराकडे जाताना काटेभोगाव व बाजारभोगावच्या मध्ये रस्त्यावर पाणी आले आहे. बाजारभोगावला जाण्यासाठी पोहाळेवाडीकडून पर्यायी मार्ग असला तरी पुढे पाटपन्हाळे पुलाजवळ रस्त्यावर पाणी असल्याने अणुस्कुराचा दळणवळणाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. 

दिवसभर कळे, साळवण, गगनबावडा, काटेभोगाव, बाजारभोगाव परिसरात पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे कळ्याच्या पुढे लोंगे गावाजवळ पाणी आले. मात्र, तेथे पाण्याची पातळी कमी असल्याने वाहतूक पाण्यातून चालू राहिली. पुढे मांडुकलीजवळ दोन ठिकाणी रस्त्यावर आलेल्या पाण्याची पातळी अधिक असल्याने वाहतूक पूर्णपणे थांबली. या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने साळवणच्या पुढे मार्गावर पूर्ण शुकशुकाट राहिला. पोलिसांनीही मार्गात अडथळे उभे करून पूरस्थितीची कल्पना वाहनचालकांना दिली. कळे येथून पुढे अणुस्कुराकडे होणारी वाहतूक काटे भोगावच्या पुढेच काही अंतरावर मोडक्‍या ओढ्यास पाणी आल्याने थांबली; पण बाजारभोगावकडे जाण्यासाठी पोहाळेवाडीचा मार्ग असल्याने त्या मार्गावर वाहनांची गर्दी झाली. 

सावधगिरीचे फलक
पोलिसांनी पूर परिस्थितीची कल्पना देण्यासाठी ठिकठिकाणी अडथळे उभे करून सावधगिरीचे फलक उभे केले आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी पुढचा प्रवास थांबवून ते परत गेले. विशेष म्हणजे, जेथे पाणी आले आहे. त्याच्या अलीकडे दोन-तीन किलोमीटरवर सावधगिरीचे फलक उभे केल्याने वाहन चालकांचा फेरा कमी झाला.

Web Title: closed road to Gaganbavad due to rain