अक्कलकोटला सीएम चषक स्पर्धेचे उद्धाटन

Akkalkot
Akkalkot

अक्कलकोट : सीएम स्पर्धेत खेळाडूंनी विजयासाठी संघर्ष करावा,महाराष्ट्रातील युवक वर्ग भरकटत जाण्यापेक्षा चांगल्या मार्गाने जावेत आणि त्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी स्पर्धेत भाग घ्यावा.

पालकांनी आपल्या मुलांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त कारावेत आणि त्यांचे भविष्य आणि राज्य व राष्ट्राचे भविष्य उज्वल करावे असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. ते अक्कलकोट येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मैदानावर सीएम चषक स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेवेळी बोलताना व्यक्त केले.

सदर उद्घाटन समारंभ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार अमर साबळे, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पणाने आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून तसेच  महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेचे जलयुक्त शिवार व्हॅलीबाल स्पर्धेने औपचारिक  उद्धाटन करण्यात आले.भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या संयोजनातून प्रदीप पाटील,ऋतुराज राठोड व युवा मोर्चा संयोजनातून तालुक्यातील तरुणांसाठी  सीएम चषक कला-क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी आनंद तानवडे, अक्कलकोटच्या नगराध्यक्षा शोभा खेडगी, दुधनीचे नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, गजानन भाकरे, राम होनराव, यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, अण्णाराव बाराचारी, मिलन कल्याणशेट्टी, मल्लिनाथ स्वामी, शिवशरण जोजन,अप्पू परमशेट्टी, सागर तेली, मोतीराम राठोड, बसवराज तानवडे, सुरेखा होळीकट्टी,महेश पाटील,प्रसिद्धी प्रमुख प्रदीप पाटील आदींसह अक्कलकोट,दुधनी व मैंदर्गी नगरसेवक,पंचायत समिती सदस्य, तसेच तालुका व शहर भाजप कार्यकारणी सदस्य आणि पदाधिकारी आदींची यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकात सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की प्रास्ताविक करताना तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेला तालुक्यात भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आज घडीला तालुक्याची रँकिंग राज्यामध्ये बावीसावी आहे ऑफलाईन नोंदणी धरून टॉप दहा मध्ये आहे ही बाब खरोखर तालुक्याच्या दृष्टीने भूषणावह आहे असे म्हणाले. यावेळी सहकारमंत्री देशमुख म्हणाले की या यावेळी महेश हिंडोळे, आनंद तानवडे, अमर साबळे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक लामकाने यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com