अबब ! पैलवान कोंबडा दीड हजारला

अबब ! पैलवान कोंबडा दीड हजारला

कामेरी - आकाडीच्या यात्रेसाठी लागणाऱ्या कोंबडा - कोंबडी खरेदीसाठी ग्रामीण भागातील लोकांनी इस्लामपूर बाजाराकडे धाव घेतली. या बाजारात साखराळे येथून आणलेला आज दीड हजार रुपयांच्या पैलवान कोंबडा लक्षवेधी ठरला.  

आज बाजारात देशी कोंबडा - कोंबडीचा दर चांगलाच वधारला होता. तीनशे रुपयांची कोंबडी पाचशे; तर कोंबड्याचा दर पाचशे रुपयांपासून पंधराशे रुपयांपर्यंत होता. मात्र, व्यापारी देशी कोंबडा-कोंबडीऐवजी संकरित कोंबडा - कोंबडी विक्रीसाठी मोठ्याप्रमाणात घेऊन आले होते.

आजच्या आठवडा बाजारात साखराळे येथील एका घरगुती विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेला कोंबडा लक्षवेधी ठरला. या कोंबड्याला अनेकजण पाहायला आले. दीड हजार रुपये या कोंबड्याची किंमत मालकाने सांगितली होती.

इस्लामपूर बाजाराबरोबरच कासेगाव, येलूर या आठवडा बाजारातही कोंबडा, कोंबडीला मागणी जास्त होती. आज एकादशी असताना देखील इस्लामपुरात बाजार कोंबड्याने भरगच्च भरला होता. खरेदीसाठी लोकांची झुंबड होती.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com