सांगलीत NDRF ची दोन पथके दाखल: जिल्हाधिकारी डॉ. चौधरी

सांगलीत NDRF ची दोन पथके दाखल: जिल्हाधिकारी डॉ. चौधरी
Updated on
Summary

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नागरिकांनी बोटींमार्फत रेस्क्यु करण्याची वेळ येवू देऊ नये, वेळ आहे तोपर्यंत त्वरीत सुरक्षितस्थळी स्थलांतरण करावे.

सांगली: जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यासाठी एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण करण्यात आले असून या पैकी एक पथक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे. ते आष्टा व शिरगाव या ठिकाणी कार्यरत आहे. आज रात्री दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार आहे, अशी माहिती देऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

सांगलीत NDRF ची दोन पथके दाखल: जिल्हाधिकारी डॉ. चौधरी
सांगली धोक्याकडे; आयर्विनची पातळी जाऊ शकते 52 फुटाकडे

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नागरिकांनी बोटींमार्फत रेस्क्यु करण्याची वेळ येवू देऊ नये, वेळ आहे तोपर्यंत त्वरीत सुरक्षितस्थळी स्थलांतरण करावे. जिल्ह्यात आतापर्यंत १०० कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले असून त्यांची व्यवस्था दोन निवारा केंद्रांमध्ये करण्यात आली आहे. जसजसे स्थंलातरीत कुटुंबांची संख्या वाढेल त्या प्रमाणात निवारा केंद्रांची संख्या वाढविण्यात येतील. सध्या आयर्विंन पुल येथे पाणी पातळी ४१ फुटांहून अधिक असून कोयना धरणातून विसर्ग वाढल्यामुळे पाणी पातळी संध्याकाळपर्यंत आणखी १० ते १२ फूट वाढण्याची शक्यता आहे.

सांगलीत NDRF ची दोन पथके दाखल: जिल्हाधिकारी डॉ. चौधरी
चांदोली परिसरात 165 मिलिमीटर पावसाची नोंद...वारणा नदी पात्राबाहेर

सांगली आयर्विंन पुलाखाली पाणी पातळी ५२ फुटांपर्यंत जाईल हे लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:हून स्थलांतरणासाठी त्वरित प्रतिसाद द्यावा व प्रशासनाला सहकार्य करावे. वेळीच स्थलांतरीत केल्यास पुढील धोके टाळता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केले आहे.

सांगलीत NDRF ची दोन पथके दाखल: जिल्हाधिकारी डॉ. चौधरी
#SangliFloods कृष्णा - वारणा नद्यांचा पूर लागला ओसरू

व्यापाऱ्यांनाही त्यांनी आवाहन केले आहे की, आयर्विन पुलाखाली पाणी पातळी ५० फुटांपर्यंत वाढल्यास बाजारपेठेत, व्यापारीपेठेत पाणी येवू शकते त्यामुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या साहित्याची हलवाहलव करावयाची असल्यास त्यांनाही मुभा देण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रशासनाची यंत्रणा कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com