चला, सिंधुदुर्गची सफर करू या...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - सकाळ माध्यम समूह आणि मैत्रेय प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या दुर्ग-धारातीर्थ-अरण्यदर्शन मालिकेअंतर्गत तिसरी मोहीम 27 नोव्हेंबरला होणार असून त्यातून सिंधुदुर्ग गडाची सफर घडणार आहे. सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

कोल्हापूर - सकाळ माध्यम समूह आणि मैत्रेय प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या दुर्ग-धारातीर्थ-अरण्यदर्शन मालिकेअंतर्गत तिसरी मोहीम 27 नोव्हेंबरला होणार असून त्यातून सिंधुदुर्ग गडाची सफर घडणार आहे. सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

सिंधुदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणपासून जवळच एका खडकाळ बेटावर शिवरायांनी उभारला आहे. हा किल्ला अरबी समुद्रात गेल्या अनेक वर्षांपासून समुद्राच्या लाटांना समर्थपणे झुंज देत आजही दिमाखात उभा आहे. एखादा भक्कम जलदुर्ग बांधण्याचा विचार करीत असतानाच राजांना मालवणजवळच्या समुद्रातील कुरटे नावाच्या बेटाची माहिती समजली. त्यावर त्यांनी तेथेच जलदुर्ग बांधायचे ठरविले अन्‌ सिंधुदुर्ग आकाराला आला. अनेक अडचणींचा सामना करून हा किल्ला समुद्रात कसा बांधला असेल, साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेल्या या गडाची वळणदार तटबंदी आजही समुद्राच्या लाटांशी समर्थपणे झुंजते आहे. त्यामागचे रहस्य काय, असा सारा रोमांचकारी शौर्यशाली इतिहास प्रसिद्ध दुर्गअभ्यासक डॉ. अमर अडके मोहिमेत उलगडतील.

शिवरायांचे मंदिर, त्यातील शिवरायांची मूळ मूर्ती; तसेच हाताच्या व पायाच्या पंजाचे ठसे या गडाने आजवर जपले आहेत. त्याशिवाय सर्जेकोट, पद्मदुर्ग, मौनीबाबांचे मंदिर आदी ठिकाणांनाही मोहिमेत भेट दिली जाणार आहे. त्यासाठी वीस नोव्हेंबरपूर्वी पूर्वनोंदणी आवश्‍यक आहे. चला तर मग, इतिहासात अजिंक्‍य राहिलेल्या या समुद्रातील गडांचा राजा असणाऱ्या किल्ल्याची सफर करू या...!

मोहीम अशी होईल...

  • - 27 नोव्हेंबरला सकाळी पाचला "सकाळ'च्या शिवाजी उद्यमनगर येथील कार्यालयापासून वाहने रवाना.
  • - सकाळी आठ वाजता दाजीपूर येथे आगमन. परस्पर परिचय आणि अल्पोपाहार
  • - सकाळी अकरा ते दुपारी दोन सिंधुदुर्ग दर्शन
  • - दुपारी दोन ते तीन- दुपारचे जेवण
  • - दुपारी तीन- संकल्पस्थळ मोरयाचा धोंडा दर्शन
  • - त्यानंतर कोल्हापूरकडे परतीचा प्रवास.
  • - पुरुषांसाठी टी शर्ट- फुलपॅंट- थ्री फोर्थ, महिलांसाठी चुडीदार आवश्‍यक.
  • - बॅटरी, पाण्याची बाटली आवश्‍यक.
  • - स्वतःची नेहमीची औषधे बरोबर असावीत.
  • - नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क- जयश्री- 9146041816, दीपक- 9156333202.
Web Title: Come on, let's ride sindhudurg district ...!