
कडेगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रारंभ सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांचे हस्ते आज झाला.
कडेगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रारंभ सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांचे हस्ते आज झाला.
यावेळी शांताराम कदम म्हणाले,""कोरोना काळात राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केले. त्यामुळे कोरोना नियंत्रणात राहण्यास मदत झाली. तर आता दुसऱ्या लाटेतही आरोग्य विभागाने केलेली जनजागृती व उपाय योजनेमुळे कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.''
कोरोनाची लस आली असून तालुक्यातील लोकांना लस देण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. लस आली म्हणून लोकांनी बेफिकीर न राहता मास्कचा वापर नियमित करावा, असे आवाहन कदम यांनी केले.
यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दाजी दाईगडे, सुरेश थोरात, विजय शिंदे, दिनकर जाधव, सुनील पवार, सागर सूर्यवंशी, वसंत रास्कर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले, डॉ. आशिष कालेकर, डॉ. पौर्णिमा श्रुगांरपुरे, वसंतराव रास्कर आदी उपस्थित होते. डॉ. वैभव पत्की यांनी आभार मानले.
संपादन : प्रफुल्ल सुतार