शिक्षक दिन विषेश : खानापूर तालुक्‍तातील 'हे' शिक्षक धडपडतात  शाळांच्या विकासासाठी

मिलिंद देसाई
Saturday, 5 September 2020

खानापूर तालुक्‍यातील विविध शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी एकत्र येत धडपड शिक्षक मंचची स्थापना केली आहे.

बेळगाव : विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शिक्षक नेहमीच धडपड करीत असतात. मात्र खानापूर भागातील काही शिक्षकांनी धडपड शिक्षक मंचच्या माध्यमातून शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी विषेश उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे दर शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या वेळी शाळांमध्ये जाऊन शैक्षणिक मार्गदर्शन करण्याबरोबरच शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा घेतल्या जात आहेत. तसेच शाळा व समाज एकत्रिक यावेत आणि त्यातून शाळांचा विकास व्हावा यासाठी आतापर्यंत खानापूर व बेळगाव तालुक्‍यातील 100 हुन अधिक शाळांमध्ये पालकांशी संवाद कार्य शाळांमधून साधण्यात आला आहे. 

खानापूर तालुक्‍यातील विविध शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी एकत्र येत धडपड शिक्षक मंचची स्थापना केली आहे. या माध्यमातुन शाळांचे डिजिटल शिक्षण व संगणक साक्षरतेसाठी आधुनिक तंत्रझानाचा उपयोग केला जात आहे. तसेच डिजिटल शिक्षण पद्धत प्राथमिक शाळांमध्येही लागु व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असुन धडपड शिक्षक मंचमध्ये सध्या 25 शिक्षक आपल्या शाळेतील शैक्षणिक काम संपवून ड्युटीच्या वेळी इतरत्र शाळांसाठी कार्यरत आहेत.

हेही वाचा- खासदार माने घराण्यास हा नंबर आहे लकी जाणून घ्या

तसेच कर्नाटक सरकारच्या मराठी पाठपुस्तक व इतर विभागात धडपड मंचमधील शिक्षकांनी काम केले आहे. पारंपारिक शिक्षण पद्धतीला फाटा देवून ज्ञान रचनावादावर आधारित विद्यार्थी केंद्रीत शिक्षणाव्दारे शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात असुन खानापूर तालुक्‍तातील अनेक शाळांमध्ये धडपड मंचच्या प्रयत्नांना यश आले असुन काही शाळांचहा कायापालट झाला आहे. साहित्य निर्मिती कार्यशाळा, शाळेचे रंगकाम करताना, डीजिटल वर्गखोली तयार करणे, समाजाकडून शाळेसाठी देणगी मिळवुन त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग व्हावा याकडे लक्ष देणे 
व इतर शैक्षणिक कार्यातील सहभाग घेऊन शाळांचा विकास केला जात आहे. त्यामुळे धडपड शिक्षक मंचचे कार्य कौतुकास्पद ठरत आहे. 

हेही वाचा- रेमेडेसिव्हिरचा काळा बाजार रोखणार कसा, जिल्हा परिषद यांनी उपस्थित केला सवाल

धडपड शिक्षक मंचातील सर्व शिक्षक शाळेतील काम संपल्यानंतर सुटीच्यावेळी इतर शाळांसाठी कार्य करीत असुन आतापर्यंत किमान 100 एक शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. त्यामुळे पालकांच्या सहकार्यातुन अनेक शाळांचा विकास झाला आहे. धडपड शिक्षक मंचमध्ये जास्तीतजास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न आहेत. 
विनोद पाटील, संयोजक धडपड शिक्षक मंच  

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Communication with parents is done through schools