वन्य प्राण्यांच्या नुकसानीपोटी व्याजासह भरपाईचा कायदा करणार : वनमंत्री

राजेंद्र ननावरे
शनिवार, 22 डिसेंबर 2018

मलकापूर : वन्य प्राण्यांकडुन शेतीच्या होणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये दुप्पट वाढ केली आहे. ती मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र ती वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई देण्याचा कायदा करणार आहे, अशी घोषणा वननंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केली. 

मलकापुर (जि.सातारा) येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उदघाटनासाठी आले असता त्यांनी ही घोषणा केली. पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार राजू शेट्टी, आमदार शंभुराज देसाई, आमदार शिवाजीराव नाईक, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, वनविभागाचे बी. के. राव, भारतसिंह हाडा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या विनिता व्यास आदि उपस्थित होत्या. मंत्र मुनगंटीवार यांनी जे शेतकरी, आदिवासी बांधव, जे गावात राहुन पर्यावरणाचे संरक्षण करतात त्यांना भरपाई देण्यासाठी आता फक्त अद्यादेश नसेल तर कायदा असेल असे जाहीर करुन डाॅ. शामा प्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत जगंलामध्ये जाण्याचे प्रमाण कमी करण्याचे काम सुरु आहे. ज्यांचे जंगलावर सर्व काही अवलंबुन आहे त्यांचे जंगलावरील अंवलंबीत्व शुन्यावर आणणार आहोत असे सांगितले.

Web Title: To compensate for the loss of wild animals, there will be a Compensation Act with interest : Forest Minister