स्पर्धा परीक्षार्थींसाठी रविवारी कार्यशाळा

Sakal-Vidya
Sakal-Vidya

सातारा - महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थी आज प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून विविध स्पर्धा परीक्षा देत असताना दिसून येतात. मात्र, योग्य मार्गदर्शन, वेळेचे व्यवस्थापन, सामान्य अध्ययनाच्या तयारीची रणनीती व परीक्षेच्या तयारीसाठी कालावधी या माहितीच्या अभावामुळे मागे पडताना दिसून येतात. यासाठी सिनर्जी स्टडी पॉइंट व ‘सकाळ विद्या’ यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. १७) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात, जिल्हा परिषदसमोर, सातारा येथे दुपारी चार वाजता सेमिनार होणार आहे. या सेमिनारमध्ये एमपीएससी, युपीएससी अशा स्पर्धा परीक्षांमध्ये ६०० हून अधिक यशस्वी विद्यार्थी असणारे व सुमारे १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असणारे सिनर्जी स्टडी पॉइंटचे संचालक अतुल लांडे यांचे व्याख्यान होणार आहे.

तंत्रशुध्द अभ्यास, उत्तम मार्गदर्शन आणि वेळेचे नियोजन हीच यशाची त्रिसूत्री आहे. त्यासाठी १२-१२ तासांचा घड्याळी अभ्यास केलाच पाहिजे असे नाही. नागरी सेवेमध्ये सिनर्जीने आजतागायत ५० पेक्षा अधिक टॉपर्स, ६०० पेक्षा जास्त अधिकारी दिलेले आहेत. यावर्षी देखील १३ यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले केंद्र सेवेतील स्थान पक्के केले आहे. सामाजिक जाणिवेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी सिनर्जीने फारूक नाईकवडे आणि हज हाउस मुंबई यांच्या सहकार्याने विशेष मार्गदर्शन वर्ग चालविलेले आहेत. गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनासाठी सिनर्जी करत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून प्रशासनात आपल्या कामगिरीने महत्तवाचा ठसा उमटवणाऱ्या अधिकाऱ्यांसोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेल्या दिग्गजांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद सिनर्जी वेळोवेळी आयोजित करत असते.

यामध्ये आत्तापर्यंत प्रशासकीय अधिकारी सोडून प्रख्यात चित्रपट समीक्षक समर नखाते, ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर, पानिपतकार विश्वास पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके अशा अनेक मान्यवरांची मांदियाळी सिनर्जी व विद्यार्थ्यांना लाभली आहे. पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा पूर्वपरीक्षा कशी उत्तीर्ण करावी, यासाठी या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना विविध परीक्षांविषयी मार्गदर्शन होणार आहे.

कधी - रविवार, १७ मार्च २०१९
कोठे - यशवंतराव चव्हाण सभागृह (डीसीसी हॉल), जिल्हा परिषदेसमोर, सातारा
केव्हा - दुपारी चार वाजता
वक्ते - अतुल लांडे
विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य
माहितीसाठी संपर्क  -  ९९२२९१३३४५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com