मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांसह सहाजणांविरोधात तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

सोलापूर- भोपाळमध्ये झालेले एन्काऊंटर हे सुनियोजित कट आहे. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्‍वास आहे. माझा मुलगा खालिद मुछाले निर्दोष होता असे सांगत त्याची आई महेमुदा मुछाले यांनी गुरुवारी याप्रकरणात मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंग यांच्यासह सहाजणांविरोधात एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारी अर्जाची नोंद करून पुढील कार्यवाहीसाठी भोपाळ पोलिसांकडे पाठविण्यात आल्याचे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितले. 

मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंग, विशेष पोलिस महानिरीक्षक योगेश चौधरी, पोलिस महासंचालक ऋषिकुमार शुक्‍ला, भोपाळचे पोलिस अधीक्षक अरविंद सक्‍सेना, भोपाळचे कारागृह अधीक्षक अखिलेश तोमर, मध्य प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख संजीव शामी आदींच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली आहे. खालीदची आई मेहमुदा मुछाले आणि त्यांचे कुटुंबीय गुरुवारी दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाले. तक्रार घेऊन आलेल्या शिष्टमंडळास थांबावे लागले. तेथील अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. शेवटी तक्रार दाखल करून घेण्यात आली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त सेनगावकर यांची भेट घेतली. त्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. ही घटना सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात घडली नाही त्यामुळे इथे गुन्हा दाखल करता येणार नाही. तक्रारी अर्ज पुढील कार्यवाहीसाठी भोपाळ पोलिसांकडे पाठविण्यात येईल असे सांगितले. 

दरम्यान, खालीदचे वकील तैवहर पठाण खान यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांकडे तक्रारी अर्ज दिल्याची माहिती दिली. यावेळी मेहमुदा मुछाले, जमियत उल्मा ए महाराष्ट्रचे अध्यक्ष मोहंमद नदीम सिद्दीकी, सोलापूरचे मौलाना हरीस शेख यांच्यासह मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे शाम कदम, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फारुक शेख, भारत मुक्ती मोर्चाचे ऍड. सैफन शेख, बामसेफचे बापू मस्के आदी उपस्थित होते.

Web Title: Complaint against Madhya Pradesh home minister and six others