पंधरा वर्षांपासून दवाखाना चालविणाऱ्या बोगस बंगाली डॉक्‍टरावर गुन्हा दाखल 

a complaint has been filed against bogus Bengali doctors running the dispensary
a complaint has been filed against bogus Bengali doctors running the dispensary

सोलापूर : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे कायदेशीर नोंदणी न करता डॉक्‍टर ही उपाधी लावून औषध गोळ्या, इंजेक्‍शन देणारा बोगस डॉक्‍टर गुरुदास निताई बिश्‍वास (रा. अंबल रेसिडेन्सी, गांधीनगर, गोंधळी वस्ती, सोलापूर) याच्यावर पोलिस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व सोलापूर महानगरपालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली. बिश्‍वास हा गेल्या 15 वर्षांपासून दवाखाना चालवित असल्याची माहिती समोर आली आहे. 

महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश काळे, आरोग्य निरीक्षक श्रीधर कुलकर्णी यांच्या सहकार्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पथकाने जोडबसवण्णा चौकातील बिश्‍वास याच्या दवाखान्यावर छापा टाकला. महानगरपालिका वैद्यकीय पथकाने त्याची वैद्यकीय पदवी तपासली. त्याच्याकडे अल्टरनेटिव मेडिसिन प्रॅक्‍टिस करण्याची पदवी असल्याचे समोर आले. पण महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे कायदेशीर नोंदणी न करता डॉक्‍टर ही उपाधी लावून तो रुग्णांना अॅलोपॅथीच्या गोळ्या, इंजेक्‍शन देत होता. ऑपरेशन करून दवाखाना चालवित होता. त्याच्यावर जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश मासाळ, पोलिस कर्मचारी शन्नुराणी इनामदार, रेखा भुजबळ, उमेश खरात यांनी ही कामगिरी केली आहे. 

शहरात बोगस डॉक्‍टर दवाखाने उघडून रुग्णांवर उपचार करीत आहेत व रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याच्या तक्रारी आल्याने गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या आदेशानुसार मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने चौकशी केली. अशाप्रकारे कोणत्या भागात बोगस डॉक्‍टर असतील तर आयुक्तालयाशी संपर्क साधावा. 
- प्रकाश मासाळ, सहायक पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com