'रोहयो' ची कामे प्राधान्याने करावी : विजयराज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

मोहोळ : ग्रामपंचायत स्तरावर येणारा १४ व्या वित्त आयोगाच्या निधीची तरतूद होते पण तो निधी खर्च केला जात नाही, त्यामुळे हा निधी शासनाला परत जातो. म्हणून हा निधी १०० टक्के कसा खर्च होईल यासाठी प्रयत्नशील रहा. रोजगार हमी योजनेची यंत्रणा मजबूतपणे राबवा, विहीरींना व पाणंद रस्त्याला परवानगी द्या अशा सुचना मोहोळ तालुका विकास समितीचे अध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी अधिकाऱ्यांना केली.

जिल्हा परिषदेकडून विशेष अधिकारात गठित केलेली 'तालुका विकास समिती' ची मोहोळ तालुक्यातील ही पहिलीच बैठक होती. सभापती विजयराज डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली मोहोळ पंचायत समितीच्या सभागृहात ही आढावा बैठक आयोजीत केली होती. त्यावेळी डोंगरे बोलत होते. यावेळी मोहोळ पं.स.च्या समता गावडे, उपसभापती साधना देशमुख, आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष तथा गटनेते अशोक सरवदे, जि.प.सदस्य उमेश पाटील, पं.स.सदस्या डॉ.प्रतिभा व्यवहारे, सुनिता भोसले, शारदा पाटील, सिंधु वाघमारे, रत्नमाला पोतदार, माऊली चव्हाण, जालिंदर लांडे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डोंगरे म्हणाले, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामसेवकांनी आपल्या गावातील नागरिकांना पाण्याच्या काटकसरीचे नियोजन करण्यास सांगावे. गावातील टंचाईचा आराखडा ग्रामसेवकांनी पंचायत समितीला सादर करावा. शिवाय 'डासमुक्त गाव' ही संकल्पना राबवुन त्यासाठी प्रत्येक घरात सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोषखड्डा असावा आणि यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा. यासह अनेक महत्वाच्या सूचना दिल्या. 

Web Title: complete the work of rohayo with preference