अक्कलकोटला भाजपा बूथ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

राजशेखर चौधरी
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

अक्कलकोट - 'मेरा बूथ सबसे मजबूत हर बूथ भाजपा युक्त' चा नारा देत
भारतीय जनता पक्षाच्या अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील बूथ कार्यकर्त्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला. 

अक्कलकोट - 'मेरा बूथ सबसे मजबूत हर बूथ भाजपा युक्त' चा नारा देत
भारतीय जनता पक्षाच्या अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील बूथ कार्यकर्त्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला. 

अक्कलकोट येथील लोकापुरे मल्टिपर्पज हॉल येथे झालेल्या या प्रशिक्षणास सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना केंद्र आणि राज्य सरकारची उपलब्धी आणि जनाहिताची कामे जनतेपर्यंत पोचिविण्याचे आणि गाफील न राहता आगामी निवडणूक काळासाठी आपली गावपातळीवरची बूथ यंत्रणा सक्षम ठेवावा असे आवाहन केले.यावेळी तीन सत्रात हे प्रशिक्षण घेण्यात आले.पहिल्या सत्रात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दीपप्रज्वलन करून प्रारंभ केला. 

यावेळी तालुका अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, आनंद तानवडे, नगराध्यक्षा शोभा खेडगी, दुधनी नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, बसलिंगप्पा खेडगी, सुरेखा होळीकट्टी, मल्लिनाथ स्वामी, शिरीष पाटील, ज्ञानेश्वर म्याकल, शिवशरण जोजन, मिलन कल्याणशेट्टी, परमेश्वर यादवाड, राजशेखर मसूती, अप्पासाहेब परमशेट्टी, अप्पासाहेब पाटील, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक, भाजपा सरपंच आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी देशमुख यांनी यावेळी सर्व कार्यकर्त्यांना मोदी सरकारच्य जन धन योजना, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमापी योजनेची, पीक विमा योजना, उज्वला गॅस योजना अशा अनेक योजनाची सविस्तरपणे माहिती दिली व सरकारची उपलब्धी जनतेपर्यंत देण्याचे आवाहन केले.तसेच कार्यकर्त्यानी गाफील न राहता बूथ पातळीवर यंत्रणा सज्ज ठेवावी आणि मतदारांशी सतत संपर्क ठेवावा असे आवाहन केले.याचवेळी सचिन कल्याणशेट्टी यांनी पक्षाची धोरणे व कार्यकर्त्यांत आत्मबल वाढविणे, महेश हिंडोळे यांनी निवडणूक व्यवस्थापन तर ज्ञानेश्वर म्याकल यांनी आपला परिवार-विचार यावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारने चांगले काम केल्यानेच अक्कलकोट तालुक्यात भाजपला चांगले यश मिळू शकले.भाजप कार्यकर्त्यांनी निरंतर कष्ट आणि मेहनत करावी म्हणजे आगामी काळात भाजपला आणखी चांगले दिवस येतील.खासदार अमर साबळे म्हणाले की श्यामाप्रसाद मुखर्जी,दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांचे त्याग आणि परिश्रम हे भाजपला देशात इथपर्यंत पोचविण्यास कारणीभूत आहेत.विरोधी पक्षाच्या अपप्रचाराला ठोस उत्तर देऊन तो हाणून पाडावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशरण जोजन यांनी केले तर आभार यशवंत धोंगडे यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Completed the BJP booth workers training camp in Akkalkot