सवलतीमुळे मंदीच्या वातावरणात साध्या यंत्रमागधारकांना मोठा दिलासा

सवलतीमुळे मंदीच्या वातावरणात साध्या यंत्रमागधारकांना मोठा दिलासा

इचलकरंजी - साध्या यंत्रमागासाठी प्रति युनिट 1 रुपये वीज दर सवलतीची बिले प्रत्यक्षात लागू झाली आहेत. त्यामुळे साधे यंत्रमागधारक सुखावले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून वीज दर सवलीतीची केवळ चर्चा होत होती. आता मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या सवलतीमुळे मंदीच्या वातावरणात साध्या यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वस्त्रोद्योग धोरणातील तरतूदीनुसार साध्या यंत्रमागास प्रति युनिट 1 रुपये वीज दरात सवलत देण्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली होती. त्याच्या अंमलबजाणीकडे लक्ष लागले होते. सवलतीची घोषणा 21 डिसेंबररोजी करण्यात आली होती. या शासन निर्णयाच्या दिवसापासून सवलत जाहीर करण्यात आली होती. मात्र याचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर उद्योगाची नोंदणी करण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळे वीज दर सवलत मिळणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. किंबहूना साध्या यंत्रमागधारकांत अस्वस्थता पसरली होती. 

दरम्यान, जानेवारीची वीज बिले आज 27 एचपी खालील साध्या यंत्रमागधारकांच्या हातात पडली आहेत. त्यामध्ये शासनाने जाहीर केलेली एक रुपये अतिरिक्त वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे साधे यंत्रमागधारक सुखावले आहेत. तसेच वीजदर सवलतीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. वीजदर सवलतीवरुन अनेकवेळा टिकाटिप्पणी झाली होती. मात्र अखेर वीजदर सवलतीचा लाभ मिळाल्यामुळे साध्या यंत्रमागधारकांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

कोट्यवधी रुपये वाचणार
शहरात सुमारे साडेपाच हजार साधे यंत्रमाग ग्राहक आहेत. वीज दर सवलतीमुळे त्यांचे महिन्याला कोट्यवधा रुपये वाचणार आहेत. मंदीच्या काळातून मार्गक्रमण करणार्‍या या उद्योगाला हा मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात सुमारे 80 हजार साधे यंत्रमाग वीजग्राहक आहेत.

“साध्या यंत्रमागधारकांच्या वीजदर सवलतीसाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले. यामुळे साध्या यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.“
- विनय महाजन,
अध्यक्ष - यंत्रमागधारक जागृती संघटना

आमदार हाळवणकर यांचा पाठपुरावा
साध्या यंत्रमागांना वीजदर सवलत मिळण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी सातत्यांने पाठपुरावा केला होता. याबाबत त्यांनी अधिवेशनातही प्रश्‍न उपस्थीत केला होता. प्रत्यक्षात सवलत लागू झाल्यामुळे अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com