महाराष्ट्र राज्य प्रहार अपंग संघटनेच्या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्या

हुकूम मुलाणी
मंगळवार, 29 मे 2018

मंगळवेढा :  महाराष्ट्र राज्य प्रहार अपंग संघटनेच्या तालुक्यातील अपंगानी त्याच्या विविध मागण्यासाठी केलेल्या उपोषणातील उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने येथील ग्रामीण रूग्णांलयात दाखल करण्यात आले. 

मंगळवेढा :  महाराष्ट्र राज्य प्रहार अपंग संघटनेच्या तालुक्यातील अपंगानी त्याच्या विविध मागण्यासाठी केलेल्या उपोषणातील उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने येथील ग्रामीण रूग्णांलयात दाखल करण्यात आले. 

अपंगानी त्याच्या विविध मागण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाकडे वारंवार निवेदने देवूनही प्रशासनानी याकडे याकडे दुर्लक्ष केले म्हणून आज सकाळी पंचायत समिती समोर उपोषण सुरू केले. उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे उपोषणरक्ताची प्रकृती खालावली. त्यांना तात्काळ 108 नंबरवर काॅल करुन रूग्णवाहीकेने ग्रामीण रूग्णांलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी तहसिलदार आप्पासाहेब समिंदर पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे दाखल झाले. दुपारी चार पर्यंत पंचायत समितीचे अधिकारी न आल्याने उर्पोषणकर्ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही उपोषण केले असल्याचे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे म्हणाले

Web Title: the condition of maharashtra state prahari handicapped association's hunger stricker