esakal | Belgaum LokSabha Update:भाजपच्या मंगला अंगडी यांना 10 हजाराची आघाडी तर काँगेस, म. ए. समिती पिछाडीवर

बोलून बातमी शोधा

Belgaum LokSabha Update: भाजपच्या मंगला अंगडी यांना 10 हजाराची आघाडी तर काँगेस, म. ए. समिती पिछाडीवर
Belgaum LokSabha Update: भाजपच्या मंगला अंगडी यांना 10 हजाराची आघाडी तर काँगेस, म. ए. समिती पिछाडीवर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : भाजप उमेदवार मंगला अंगडी यांनी एक लाखाचा टप्पा पार करतानाच 10 हजाराची आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांना 1 लाख 17 हजार मते पडली आहेत.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार मंगला अंगडी सुरवातीला सुमारे 2 हजार मताधिक्याने आघाडीवर होत्या. त्यानंतर 10 हजाराचे मताधिक्य वाढले. पहिल्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी आघाडीवर होते.

हेही वाचा- बेळगाव लोकसभा: भाजपच्या मंगला अंगडी आघाडीवर तर काँग्रेसचे जारकीहोळी पिछाडीवर

दुसऱ्या फेरीत अंगडी यांनी आघाडी घेतली आहे. अंगडी यांना 1 लाख 26 ,555 मते पडली असून, जारकीहोळी यांना 1लाख 15,359 मतदान झाले असून सुमारे 10 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना 32,693 मते पडली आहेत.

बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी 17 एप्रिलला चुरशीने मतदान झाले. त्यानंतर निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यात काँग्रेसचे उमेदवार जारकीहोळी यांना 1 लाख 17 हजार 288 मते पहिली असून, उमेदवार भाजप अंगडी 1 लाख 27 हजार 623 मतदान झाले आहे. सुमारे दहा हजार मताधिक्यानी आघाडी घेतली आहे.

Edited By- Archana Banage