दुष्काळ हटू दे, राहूल गांधी पंतप्रधान होऊ देत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

एक नजर

  • राज्यातील दुष्काळ हटू दे, राष्ट्रीय काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत, असे काँग्रसचे जोतिबाला साकडे. 
  • मंदीराला भर उन्हात प्रदक्षिणा घालून जोतिबासमोर मांडली व्यथा. 
  • काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांची उपस्थिती. 
  • मंदीर परिसरात भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी. 

जोतिबा डोंगर - राज्यातील दुष्काळ हटू दे, राष्ट्रीय काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत, असे साकडे आज कोल्हापूर जिल्ह्यातील काॅँग्रेस कार्यकर्त्यांनी जोतिबाला घातले. मंदीराला भर उन्हात प्रदक्षिणा घालून आपली व्यथा जोतिबा देवासमोर मांडली. यावेळी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे उपस्थित होते. मंदीर परिसरात भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

काॅंग्रेसच्या हयात नसलेल्या नेत्यांवर आरोप केले जात आहेत. सामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भाजप सरकार सत्तेत राहणार नाही. या देशाची सुत्रे राहुल गांधी यांच्याकडे जातील असा विश्वास यावेळी श्री. आवाडे यांनी व्यक्त केला. 

यावेळी सुरेश कुराडे ,पीटर चोधारी, रविंद्र मोरे, विलासराव खानविलकर, महमद शरीफ शेख, सुशील पाटील कौलवकर, अभिजीत पाटील, एस. के. माळी, रावसाहेब आलासे, दिपाताई पाटील, लीला धुमाळ, वैशाली महाडिक, सचिन हेरवाडे, बाळासाहेब माने उपस्थित होते.

Web Title: Congress activists visit Jotiba Temple