
“Congress stages Rasta Roko in Karnal demanding road tarring; various groups extend support.”
Sakal
सांगली: ‘शहर काँग्रेसतर्फे आज येथील कर्नाळ रस्ता दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन झाले. प्रभाग क्रमांक १२ कर्नाळ चौकी ते शिवशंभो चौक रस्त्याची गेल्या दोन वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे,’ या मागणीसाठी आंदोलन झाले. ‘आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,’ असा इशारा देण्यात आला.