काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायणराव पवार यांचे निधन 

भद्रेश भाटे
गुरुवार, 26 जुलै 2018

वाई (सातारा) : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नारायणराव कृष्णाजी पवार (वय 83) यांचे अाज (गुरुवार) मु. पो. चिंधवली (ता. वाई, जि. सातारा) येथे निधन झाले. ते सन 1966 ते 1984 सरपंच, चिंधवली, सन 1967 ते 1992 वाई तालुका पंचायत समिती सदस्य, सन 2015 पर्यंत किसन वीर कारखान्याचे संचालक, सन 1990 ते 1995 अध्यक्ष, वाई तालुका काँग्रेस कमिटी, या कालावधीत तीन पंचायत समिती सदस्य व एक जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात यश मिळवले. तसेच याच कालावधीत नगरपालिका निवडणुकीत वाई नगरपालिका काँग्रेसकडे आणण्यात महत्त्वाचा सहभाग होता.

तसेच सन 1992 ते 2007 जिल्हा परिषद सदस्य हाेते. सन 1999 ते 2002 जिल्हा परिषद अध्यक्ष. या कारकिर्दीत जिल्हा परिषदेला राज्य पातळीवरील सहा वेळा पुरस्कार मिळवून दिले. त्यानंतर सन 2003 ते 2007 जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून भुमिका बजावली.

Web Title: congress leader narayan pawar passed away