Video : 'जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है'; विजयी प्रणितींचा शायराना अंदाज!

Praniti-Shinde-Congress-Solapur
Praniti-Shinde-Congress-Solapur

सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील काँग्रेस भवनमध्ये शायराना अंदाजात आपला विजयाचा जल्लोष साजरा केला.

माझ्या कठीण काळामध्ये माझ्यासोबत थांबणाऱ्या प्रत्येकाचा चेहरा माझ्या लक्षात आहे, असं म्हणत ऐनवेळी साथ सोडून गेलेल्यांना त्यांनी यावेळी इशाराच दिला. यावेळी त्यांनी एक शेर सादर केला. 

"जिंदगी की असली उडान अभी बाकी है,
 मेरे इरादों का इम्तिहान अभी बाकी है,
अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन हमने, 
आगे ये सारा आसमान बाकी है"
असं म्हणत राजकारणातला मुरब्बीपणा प्रणितींनी दाखवून दिला. यावेळी 'कामासमोर दिग्गज-बिग्गज कोणी टिकू शकत नाही,' असं म्हणायला त्या विसरल्या नाहीत. यावेळी त्यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे त्यांच्यासोबतच उभे होते. 

सुशीलकुमार शिंदे ही आपल्या मुलीची री ओढत शेरो-शायरीनेच आपल्या भाषणाला सुरवात केली. प्रणितीला निवडून दिल्याबद्दल त्यांनी आपल्या मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनीही गाण्याच्या दोन ओळी सादर केल्या. ते म्हणाले, 
"तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूहीं नहीं दिल लुभाता कोई,'' असं म्हणून सभा गाजवून सोडली.

वास्तविक प्रणिती शिंदे या कालच विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी सोलापूरला येणार होत्या. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना मुंबई-सोलापूर विमानप्रवास करता आला नाही. मात्र, शुक्रवारी त्यांनी ही सगळी कसर भरून काढत समर्थकांसोबत जल्लोष साजरा केला.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा निकाल फेरीगणिक बदलत होता. मात्र, 11943 मताधिक्य मिळवत काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंनी 'हॅटट्रीक' साधली. त्यांना 48,832 इतकी मते मिळाली. एमआयएमचे फारूक शाब्दी हे 36,889 मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले. अपक्ष महेश कोठे यांना 29,526 मते, शिवसेनेचे दिलीप माने यांना 27,340 मते, तर माकपचे नरसय्या आडम 10,128 मते मिळाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com