Election Results :भाजप उमेदवाराच्या विजयी मिरवणुकीत काँग्रेस आमदार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचा मतदारसंघ असलेल्या माण खटाव विधानसभा मतदारसंघातून रणजितसिंहाना जवळपास 23215 मताधिक्य मिळाले आहे. बहुचर्चित माढा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले असून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जमीनदोस्त झाला आहे.

सातारा : माढ्यात भारतीय जनता पक्षाच्या रणजितसिंहानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजयमामाची दांडी गुल करत त्यांचा 85764 मतांनी पराभव केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजाला जायचा या बालेकिल्ल्याला भाजपकडून सुरुंग लावण्यात आला आहे. पण, सुरुंग पक्षांतर्गत बंडाळी आणि काँग्रेस आमदारांनी आघाडी धर्म न पाळल्याने झाला असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचा मतदारसंघ असलेल्या माण खटाव विधानसभा मतदारसंघातून रणजितसिंहाना जवळपास 23215 मताधिक्य मिळाले आहे. बहुचर्चित माढा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले असून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जमीनदोस्त झाला आहे.

काँग्रेसचे आमदार गोरेंनी भाजपच्या रणजितसिंहाना केवळ आपल्या मतदारसंघातून मताधिक्यच दिले नाही तर, त्यांच्या विजयी मिरवणुकीतही ते उत्साहाने सामील झाले होते. रणजितसिंहासोबत त्यांनी विजयी मिरवणुकीत सहभाग घेत गुलालही अंगावर घेतला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA participates in BJP victory ralley