काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपने संगनमताने हत्याकांड घडविले : एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

नगर : केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या काही नेत्यांनी संगनमताने घडवून आणले, असा आरोप बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

केडगाव येथील हत्या झालेल्या त्या दोन शिवसैनिकांच्या दशक्रिया विधीसाठी ते आज नगरमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. यापुढे असे धाडस कोणी करता कामा नये. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी शिवसेना शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे. 

इथे कायद्याचे राज्य आहे की गुंडाचे असा प्रश्न आहे. पोलिस व कायद्याची सर्वांना भीती राहिली पाहिजे. पोलिसांनी हत्याकांडाची निष्पक्ष तपास करावा. हत्याकांड घडल्यानंतर शिवसैनिकांनी भावनेच्या भरात रास्तारोको केला. त्यामुळे त्यांच्यावरील गंभीर गुन्हे मागे घेतले पाहिजेत. शिवसैनिक कधीच पळून जाणार नाहीत. ते स्वतः होऊन अटक होतील.

साहेब आरोपीला फाशी द्या...
साहेब माझा पती सेनेसाठी शहिद झाला. मी स्वतः यातून सावरणार आहे. पण, आता पर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. या कोणाचेही कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही यासाठी आरोपींना फाशी झाली पाहिजे, अशी भावना अनिता ठुबे यांनी व्यक्त केली. 

Web Title: Congress, NCP, BJP jointly planed this murder