esakal | काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' जि. प. सदस्यांची वर्षाखेर गोव्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Congress NCP ZP Members New Year Celebration In Goa Kolhapur Marathi News

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक 2 जानेवारीस होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आहे ती सत्ता टिकवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादीनेही मोठी ताकद लावली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' जि. प. सदस्यांची वर्षाखेर गोव्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह अपक्ष मिळून 24 सदस्यांना आज सहलीवर पाठवण्यात आले. कॉंग्रेसच्या रेश्‍मा राहूल देसाई, जीवन पाटील वगळता सर्व सदस्य गोव्याला रवाना झाले. सर्किट हाउस येथे झालेल्या कार्यक्रमावेळी आमदार सतेज पाटील व आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते. दरम्यान कॉंग्रेसचे पक्षप्रतोद उमेश आपटे यांनी सदस्यांना व्हीप लागू केला. 

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक 2 जानेवारीस होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आहे ती सत्ता टिकवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादीनेही मोठी ताकद लावली आहे. राज्यात असलेला महाविकासआघाडीचा फॉर्म्युला जिल्हा परिषदेत राबवण्यासाठी आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी जोर लावला आहे. 

हेही वाचा - अबब ! नऊ फुटांचा अजगर या शहरात 

जीवन पाटील यांची सभापतीपदाची मागणी

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. सदस्यांची फोडाफोडीही सुरु आहे. आपले सदस्य विरोधकांच्या हाताला लागू नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही "रिस्क' नको असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने सदस्य आज गोव्याला रवाना केले. राष्ट्रवादीचे नाराज सदस्य जीवन पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. ते भूमिका गुरुवारी स्पष्ट करणार आहेत. श्री.पाटील यांनी सभापती पदाची मागणी केली आहे. 

हेही वाचा - मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी यांनी मांडले दिल्लीत ठाण 

शिवसेनेची आज बैठक 

शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर हे आज शिवसेना सदस्यांशी चर्चा करणार आहेत. जिल्हा परिषदेत सेनेचे 10 सदस्य आहेत. यातील 7 सदस्य भाजप तर 3 सदस्य आघाडीकडे आहेत. माजी आमदार चंद्रदीप नरके गटाचे 3, सत्यजित पाटील- सरुडकर गटाचे 2, डॉ.सुजित मिणचेकर व संजय घाटगे गटाचे प्रत्येकी एक सदस्य आहे. हे सर्व सध्या सदस्य भाजपसोबत आहेत. तर खासदार प्रा.संजय मंडलिक गटाचे 2 व उल्हास पाटील गटाचा एक सदस्य आघाडीकडे आहे. मात्र पदाधिकारी निवडीत एक सदस्याचा अपवाद वगळता सर्व सदस्य आघाडीकडे येतील, असा विश्‍वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्‍त केला. सेनेचे अंबरिष घाटगे यांचे सासरे व भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले हे अध्यक्षपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे घाटगे हे भाजपसोबत राहतील अशी शक्‍यता आहे. 

मुंबई-कोल्हापूर प्रवासात रणनिती 

मंगळवारी (ता.24) रात्री मुंबईहून कोल्हापुरला येणाऱ्या रेल्वेत आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ एकत्र होते. या प्रवासातच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची रणनिती या दोन्ही नेत्यांनी ठरवली. त्यानुसार याची अंमलबजावणी आज सकाळी सुरु झाली. आमदार सतेज पाटील यांनी काठावरच्या सदस्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे या वेळी दिसून आले. 

loading image