अबकी बार मोदी सरकार...क्‍या हुआ चार साल; जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल 

Congress party criticised to modi government in Jan Sangharsha Yatra
Congress party criticised to modi government in Jan Sangharsha Yatra

सोलापूर : राज्यात रखडलेले सिंचन प्रकल्प, फसवी कर्जमाफी, डबघाईकडे चाललेला सहकार, वाढलेली बेरोजगारी, जीएसटीमुळे झालेले व्यापाऱ्यांचे नुकसान, बंद पडत असलेला वस्त्रोद्योग यासह अन्य मुद्यांवर लक्ष करत कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोलापुरात 'जनसंघर्ष यात्रे'च्या निमित्ताने मोदी सरकारचे अक्षरश: पिस काढले. 

मागील चार वर्षाच्या काळात देशातील एकही घटक समाधानी नाही. स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, बुलेट ट्रेन, सात-बारा कोरा, शेतीमालाला हमीभाव, आरक्षण, रोजगार निमिर्ती, उद्योगात वाढ अशा विविध घोषणा अद्यापही कागदावरच आहेत. साम-दाम-दंड च्या जोरावर निवडणूका जिंकण्याचा डाव भाजपकडून आखला जात असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला. यावेळी माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, सचिन सावंत आमदार प्रणिती शिंदे, सिद्धाराम म्हेत्रे, रामहरी रुपनवर, शरद रणपिसे, अमर काळे, माजी आमदार निर्मला ठोकळ, प्रकाश यलगुलवार, विश्‍वनाथ चाकोते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले आदी उपस्थित होते. 

राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढला 
2014 मध्ये महाराष्ट्रावर 2.42 लाख कोटींचे कर्ज होते. त्यामध्ये वाढ होऊन आता तब्बल 9 लाख कोटींचे कर्ज झाले आहे. मागील चार वर्षात शेतकऱ्यांसह सुशिक्षितांचे, उद्योजक व व्यापाऱ्यांचे प्रश्‍न कायम आहेत. सोलापुरकरांनी भाजपच्या काळात फक्‍त दोन्ही मंत्र्यांची भांडणे अनुभवली. 
- हर्षवर्धन पाटील, माजीमंत्री 

अशोक चव्हाण म्हणाले... 
- शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा न झाल्याने आत्महत्या वाढल्या 
- अगोदर लोकल रेल्वे निट चालवा मग बुलेट ट्रेनकडे बघा 
- एमआयएम भाजपची बी टीम, एमआयएमला हद्दपार करा 
- सामान्यांच्या हक्‍कासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी ही जनसंघर्षयात्रा 
- निवडणुकीपूर्वी भाजप देईल मंदिर वही बनायेंगेचा नारा 
- नरेंद्र मोदींनी सोलापुरकरांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती झाली का 
 
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले... 
- निवडणूका कधी घ्यायच्या, भाजपला यश मिळेला का याची होतेय चाचपणी 
- मरिन ऍकॅडमीसह अन्य प्रकल्प गुजरातला हलविले मग नाणार का नेत नाहीत 
- राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली : उत्पन्नात 8 टक्‍क्‍यांची घट 
- सहकारमंत्री करत आहेत सहकार मोडण्याचे काम 
- मोंझबियाची तूर आयात करण्याकरिता भाजपने केला करार 
- नव्या नोकऱ्या तर सोडाच होत्या त्या नोकऱ्याही गेल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com