काँग्रेसमधील बंडखोरीची प्रदेशाध्यक्षांकडून दखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

सांगली - सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसमधील बंडखोरीची दखल प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. येत्या १३ नोव्हेंबरला वसंतदादा जन्मशताब्दीच्या निमित्ताने ते सांगलीत येत असून निवडणुकीसंदर्भात नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. त्यावेळी बंडखोरीबाबतही चर्चा करणार आहेत. तोपर्यंत शेखर मानेंच्या पाठिंब्याचा निर्णय झाला नाही तर कारवाई करण्याचे संकेतही मिळत आहेत. 

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार समोरासमोर ठाकले असताना काँग्रेसचे नगरसेवक शेखर माने यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. अर्ज माघार घेण्याचे नाट्य घडल्यानंतर त्यांनी मोहनराव कदमांना पाठिंबा देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही. उलट आपण रिंगणात असल्याचेच सांगत लढण्याचे संकेत दिले. 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांची जन्मशताब्दी येत्या १३ नोव्हेंबरला सुरू होत आहे. त्यानिमित्त सांगलीत होणाऱ्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ कार्यक्रमास खासदार चव्हाण उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत विधानपरिषद निवडणुकीबाबत बैठक होणार आहे. काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकण्यासाठी ताकद लावली आहे. मात्र, मानेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेसच्या एकसंधतेला सुरुंग लागला आहे. त्याची दखल घेऊन रविवारी सांगलीत प्रदेशाध्यक्ष चव्हाण बैठक घेणार आहेत. बंडखोर उमेदवार शेखर माने आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या नगरसेवकांवरही कारवाई करण्याबाबत चर्चा होणार असल्याचे समजते.

विशाल पाटील गप्प का?
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शेखर माने यांच्या माघारीची जबाबदारी असलेले वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी गेल्या दोन दिवसात कसलीही हालचाल केली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचा या बंडखोरीला छुपा पाठिंबा आहे का?.. अशी चर्चा काँग्रेसजनांमध्ये आहे.

Web Title: Congress recognized insurgency by congress state president