कराड तालुक्यातील मलकापूरमध्ये काँग्रेसची सरशी

कराड तालुक्यातील मलकापूरमध्ये काँग्रेसची सरशी

मलकापूर - राज्याचे लक्ष लागलेल्या कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या पहिल्या  सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारत बालेकिल्ला राखला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर भाजपने आव्हान उभे केले होते. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिष्ठेची  निवडणूक होती. त्यांना सत्ता राखण्यात यश आले आहे.

या निवडणुकीत काँग्रेसला १४ जागा मिळाल्या तर भाजपला ५ जागा मिळाल्या. काँग्रेसच्या नीलम येडगे या विजयी झाल्या. या अगोदर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. भाजपनेही जोरदार लढत दिली.  काँग्रेसच्या नीलम येडगे यांना  ७७४७ तर भाजपच्या डॉ. सारिका गावडे यांना ७४७७ मते मिळाली. नीलम येडके २७० मतांनी विजयी झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com