जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसची सत्ता येईल- मोहनराव कदम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

सांगली - कॉंग्रेसला जिल्ह्यात चांगले वातावरण आहे. त्यामुळे पक्षाच्या चिन्हावरच निवडणुका लढविल्या जातील. युवा मंच, स्थानिक आघाड्या असे कोणतेही प्रकार जिल्हा परिषद निवडणुकीत खपवून घेतले जाणार नाहीत. यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचीच सत्ता येईल, असा दावा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. आगामी विधान परिषद निवडणूक लढवण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कदम म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 25 ऑक्‍टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत इच्छुकांनी पक्षाकडे आपले सशुल्क अर्ज दाखल करायचे आहेत. कॉंग्रेसला जिल्हा परिषदेसाठी सर्वसामान्यांमधून चांगले वातावरण आहे. जिल्ह्यात तिरंगी, चौरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार आहे. त्यामुळे स्थानिक आघाड्या, विविध नेत्यांच्या नावचे मंच, गट असे प्रकार चालणार नाहीत. तसे केल्यास त्याची तक्रार प्रदेश कार्यकारिणीकडे केली जाईल.

ते म्हणाले, ‘पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून संबंधित तालुक्‍यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. काही ठिकाणी आघाडीची, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची मागणी केली जात आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आघाडी करायची की स्वबळावर लढायचे, याचा निर्णय झालेला नाही. पक्षाचे निरीक्षक संबंधित ठिकाणी जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. ते आपला अहवाल जिल्हा कार्यकारिणीकडे सादर करतील. लवकरच त्याबाबत निर्णय होईल. या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी 21 ऑक्‍टोबरपर्यंत पक्षाकडे अर्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ता. 22 रोजी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल.‘‘

अशोक चव्हाण यांचा दौरा रद्द
वसंतदादा जन्मशताब्दीनिमित्त आयोजित बैठकीस तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा ता. 22 रोजी जिल्हा दौरा होता. मात्र तो रद्द झाला असून त्या दिवशी या विषयावर मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती मोहनराव कदम यांनी दिली.

Web Title: congress will power in zp say mohanrao kadam