दोन्ही कॉंग्रेसचे एकमत - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

कऱ्हाड - विधान परिषदेच्या प्रत्येकी तीन जागा कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढविण्यावर एकमत झाले आहे. त्यानुसार चंद्रपूर, अमरावती, परभणी या तीन जागा कॉंग्रेस लढवेल आणि कोकण, नाशिक आणि बीड-उस्माबाद-लातूर या तीन जिल्ह्यांतील एक अशा तीन जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस लढवेल. लोकसभेची पालघरची जागा कॉंग्रेस आणि गोंदियाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस लढवेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. 

श्री. पाटील यांनी आज यशवंतराव चव्हाण आणि पी. डी. पाटील यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. 

श्री. पाटील म्हणाले, ""कॉंग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी जागावाटपाबाबत चर्चा केली. त्यानुसार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधान परिषदेच्या प्रत्येकी तीन आणि लोकसभेची प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. सरकारचे नाकर्तेपणाचे धोरण, खोटी आश्‍वासने याविरुद्ध केलेल्या हल्लाबोल यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. साडेतीन वर्षांच्या काळानंतर राज्यासह देशात चित्र बददले आहे. ज्या सरकारला पारदर्शी कारभार करून सत्तेवर येण्याची इच्छा होती, त्या सरकारवर आरोप झाले आहेत. त्यामुळे लोकांचे मन बदलले आहे. कणखर विचारावर आधारित पक्ष उभा करायचा आहे. त्यासाठी बूथ समिती, ग्राम समितीला प्राधान्य देणार आहे.'' 

पलूसमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार नाही 
पतंगराव कदम यांच्या निधनाने पलूस विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली आहे. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार देणार नाही. ती जागा कॉंग्रेस पक्ष लढवेल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यांना मदत करेल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 
शिवसेनेने विधान परिषदेसाठी भाजपला मदत केली आहे, या मुद्‌द्‌यावर श्री. पाटील म्हणाले, की शिवसेना बोलते तसे वागत नाही. धड विरोधी पक्षातही नाही आणि सत्तेतही नाही, अशी त्यांची स्थिती आहे. 

साखर उद्योग मोडीत निघेल 
केंद्र सरकारने साखर कारखान्यांना सध्या दिलेली मदत कमी आहे, असे सांगून श्री. पाटील म्हणाले, ""साखर निर्यात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर आणि सध्याचे दर यामध्ये फरक आहे. तो भरून निघाला पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने हे अनुदान वाढवले पाहिजे. राज्य सरकारनेही त्यात भर घालून वाढ करण्याची गरज आहे. सध्या साखरेचे दर कमी झाले आहेत. ही स्थिती अशीच राहिली, तर साखर उद्योग मोडीत निघेल.''

Web Title: Consensus of both Congress - Jayant Patil