देशात दुसरी आयोध्या घडवण्याचे षडयंत्र : स्मिता पानसरे

AAtpadi.jpg
AAtpadi.jpg

आटपाडी : "देशाच्या संविधानावर वेगवेगळ्या माध्यमातून राजरोस हल्ले वाढले आहेत. त्यामुळे लोकशाहीच धोक्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा माज वाढत चालला आहे.'' देशात दुसरी आयोध्या घडवण्याचे षडयंत्र शिजत असल्याची घणाघाती टिका कॉ.स्मिता पानसरे यांनी येथे केली.       
शाहू फुले आंबेडकर विचारमंचाने संविधान जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त ठेवलेल्या व्याख्यानात पानसरे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच सौ वृषाली पाटील होत्या. स्वागत मंचाचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले.

पानसरे यांनी संविधान आणि लोकशाहीवर वर्णभेद, लिंगभेद आणी जातीभेद या माध्यमातून हल्ले केले सूरू आहेत त्याची उदाहरणे दिली. त्या म्हणाल्या, ''देशातील महामानवांची आपणच जाती-जातीत विभागणी केली आहे. त्यामुळे मनुवाद्यांचे फायदेच झाले. येणाऱ्या प्रत्येक विचाराची चिकित्सा केली पाहिजे. प्रत्येक विचार फायद्याचाच असतो असे नाही मात्र काही मंडळी चुकीचे तेच ते विचार शंभर वेळा विविध माध्यमातून पेरतात. त्यामुळे तो विचार खराच वाटतो. मंदिरात महिलांना प्रवेश नाकारला जातो. यामागचे खरे कारण सत्तेतून चातुर्वर्ण व्यवस्था आणण्याचे षडयंत्र आहे. त्यामुळे प्रत्येक विचाराची चिकित्सा केली पाहिजे.''
 

त्या म्हणाल्या, "बलात्कारासारख्या घटना आज ही घडत आहेत. आजही कोपर्डी घडते पण त्यावेळी सारखे मोर्चे निघत नाहीत. बलात्कार करणाऱ्याची आणि झालेल्याची जात पाहिली जाते. हा संविधानावर हल्लाच आहे. आज नागपूरच्या रेशीम बागेतून देशप्रेमाची प्रमाणपत्र वाटली जातात. त्याविरोधात बोलला तर देशद्रोही ठरवले जाते. दलित आणि बहुजनावर हल्ले सुरूच आहेत. रोहित वेमुलेॅची आत्महत्या नव्हती ती राजकीय हत्याच होती.'

अध्यक्षस्थानावरून सरपंच पाटील यांनी ''हे विचार मंचाचे व्यासपीठ विद्यापीठ व्हावे ''अशी अपेक्षा व्यक्त केली. आबासो सागर यांनी आभार मानले. यावेळी प्रा रामदास नाईक नवरे,संतोष लांडगे, रवी लांडगे आदी उपस्थित होते.     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com