शाश्‍वत शहरी विकासासाठी सोलापूर-मर्शियाचा करार 

विजयकुमार सोनवणे 
गुरुवार, 24 मे 2018

आंतरराष्ट्रीय शहरी सहकार्य कार्यक्रमांतर्गत शहरांच्या जोडीला पुढाकार घेण्यासाठी मलेशियातील क्वालालांपूरमधील फोरममध्ये सुरवात करण्यात आली आहे. त्याचे समर्थन करण्यासाठी भारत कार्यक्रम आमि महापालिका यांच्यात भागीदारी करार झाला.

सोलापूर - शाश्‍वत शहरी विकास योजनेतंर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या शहरादरम्यान आज (ता. 24) गुरुवारी सामंजस्य करार झाला. आययुसीचे प्रकल्प संचालक पिअर रॉबर्टो रिमीटी आणि आशिष वर्मा यांनी तर महापालिकेतर्फे महापौर शोभा बनशेट्टी व आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यानी स्वाक्षऱ्या केल्या.

युुरोपियन युनियनने आशिया आणि उत्तर-दक्षिण अमेरिकातील शहर आणि भागीदार शहरातील शाश्‍वत शहरी विकासावर सहकार्य वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय शहरी सहकारिता कार्यक्रम विकसित केला आहे. या करारांतर्गत स्थानिक नेत्यांना विकास समस्यांना हाताळण्यावर नवीन दृष्टीकोन ठेवून संपर्क साधता येणार आहे. आंतरराष्ट्रीय शहरी सहकार्य कार्यक्रमांतर्गत शहरांच्या जोडीला पुढाकार घेण्यासाठी मलेशियातील क्वालालांपूरमधील फोरममध्ये सुरवात करण्यात आली आहे. त्याचे समर्थन करण्यासाठी भारत कार्यक्रम आमि महापालिका यांच्यात भागीदारी करार झाला.

एक करार झाल्यावर भारतातील बारा शहरे युरोपियन युनियनमधील 12 शहरांशी जोडण्याची प्रक्रिया सुरु होईल. जी शहरे स्थानिक कृती आराखडाच्या (लोकल अॅक्‍शन प्लॅन) विकासासाठी समान शहरीकरण आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्य करेल. ही योजना दोन वर्षांपर्यंत सुरु राहणार आहे. शहराच्या विकासासाठी तांत्रिक व सहाय्यभूत आधार आदान-प्रदान केले जाणार आहेत. अभ्यास दौरा, ज्यामध्ये पाच राजकीय आणि तांत्रिक प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या विशिष्ट गरजा, विनंती आणि ओळखीसाठी सेवांची देवाणघेवाण केली जाईल. 

या आव्हानांसाठी झाला सामंजस्य करार -

Web Title: contract between Solapur-Marcia for sustainable urban development