esakal | ...म्हणू्न हलगा-मच्छे बायपास करणाऱ्या कंत्रादाराला लावले पिटाळून
sakal

बोलून बातमी शोधा

The contractor who bypassed the halga-fish was beaten

उच्च न्यायालयाने हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे तरीही न्यायालयाचा आदेश डावलून शुक्रवारी हलगा-मच्छे बायपासचे काम सुरु केले होते. या कामाची माहिती मिळताच संततप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कंत्राटदार व कर्मचारी यांना जाब विचारीत धारेवर धरले.

...म्हणू्न हलगा-मच्छे बायपास करणाऱ्या कंत्रादाराला लावले पिटाळून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बायपासचे काम सुरु करणाऱ्या कंत्रादाराला शेतकऱ्यांनी , मशिनीसह कंत्राटदाराचा पळ
सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. 5 : उच्च न्यायालयाने हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे तरीही न्यायालयाचा आदेश डावलून शुक्रवारी हलगा-मच्छे बायपासचे काम सुरु केले होते. या कामाची माहिती मिळताच संततप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कंत्राटदार व कर्मचारी यांना जाब विचारीत धारेवर धरून काम बंद पाडण्यास भाग पाडले. यावेळी शेतकरी व कंत्राटदार यांच्यात जोरदार वादावादी झाली मात्र शेतकऱ्यांनी यापुढे काम हाती घेतल्यास जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांचा विरोध डावलून मे 2019 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाने बायपासचे काम सुरु केले होते. याबाबत शेतकऱ्यांनी उच्य न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये न्यायालयाने शेतकऱ्यांची बाजू ऐकुन घेत बायपासच्या कामाला स्थगिती दिली आहे. स्थगिती मिळाल्यापासून बायपासचे काम थांबविण्यात आले होते मात्र स्थगिती आदेशाला केराची टोपली दाखवत दुपारी दाेनच्या सुमारास जेसीबी व इतर मशिनी लावुन सपाटीकरण,व चार ट्रकमधुन माती आणून टाकण्यात येत होती. याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काम सुरु असलेल्या ठिकाणी धाव घेऊन व न्यायालयाची स्थगिती असताना तुम्ही काम का सुरु केला आणि काम सुरु करण्यासाठी तुमच्याकडे अधिकृत आदेश आहे का असा संतप्त सवाल कंत्राटदार व कर्मचाऱ्यांसमोर उपस्थित केले. यावेळी कोणताही आदेश नसल्याने कंत्राटदाराला काय बोलावे ते सूचत तरीही काम सुरुच ठेवण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशिनरीनां हाकलून लावण्यास सुरुवात केली व काम सुरु करण्यास आलात तर कर्नाटक राज्य रयत संघटनेसह शेतकरी कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा दिला त्यानंतर कंत्राटदारांने मशिनी व कर्मचाऱ्यांसह पळ काढला.
रयत संघटनेचे शहर अध्यक्ष हणमंत बाळेकुंद्री, राजु मरवे, तानाजी हलगेकर, भोमेश बिर्जे, अनिल अनगोळकर, विक्रम सोमणाचे, भैरु कंग्राळकर, भरमा कंग्राळकर, संजय सुळगेकर, सिद्राय लाड, यशवंत लाड, आनंद सुळगेकर, सुभाष चौगुले, गोपाळ सोमनाचे, हरिष बाळेकुंद्री, रमाकांत बाळेकुंद्री, आनंदा काजोळकर, महादेव धामणेकर यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

loading image